मुंबई (प्रतिनिधी) : दरवर्षी मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पालिकेकडून २७ शालेय वस्तू देण्यात येतात. मात्र यंदा शाळा सुरू झाल्या असल्या तरी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप शालेय वस्तू मिळाल्या नसल्याची टिका आमदार आशीष शेलार यांनी केली आहे. दरम्यान पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या “दप्तर” दिरंगाईचे उत्तर द्यावे अशी मागणी शेलार यांनी केली आहे.
दरवर्षी मुंबई महापालिकेकडून पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, रेनकोटसह विविध २७ वस्तू देण्यात येतात. मात्र यंदा निविदाच मंजूर न झाल्याने साहित्य पोहचायला आता ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता असून दप्तर सप्टेंबरमध्येच मिळेल असा कयास असल्याचे शेलार म्हणाले. तर दुसरीकडे महापालिका शाळा इंग्रजी माध्यमाच्या करून एकीकडे पब्लिक स्कूल नावाने आदित्य ठाकरेंची प्रसिद्धी सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र गरीब विद्यार्थ्यांना रेनकोट, पाटी, पेन्सिल, दप्तराशिवाय वर्गात बसावे लागत आहे. याचे दुर्दैव असल्याची टीकाही शेलार यांनी केली.
विशेष म्हणजे शाळा सुरू झाल्या त्याच आठवडाभरात हे साहित्य विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित होते. पण अद्याप निविदा मंजूर झालेली नाही आणि यामुळे विलंब होत आहे, की काही वाटाघाटी बाकी आहेत का? असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांनी दप्तर, पेन, पेन्सिल शिवाय शाळेत जायचे का? असा देखील सवाल शेलार यांनी उपस्थित केला. दरम्यान येत्या सात दिवसांत जर हे साहित्य उपलब्ध झाले नाही तर विद्यार्थ्यांसाठी भाजप लढेल, असा इशारा आमदार आशिष शेलार यांनी दिला.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…