हुबळी (हिं.स.) : कर्नाटकमध्ये हुबळी धारवाडच्या तरीहाळा बायपासवर लॉरी आणि खासगी बसची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना हुबळीच्या क्रिम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार कोल्हापूरहून बंगळूरकडे जाणाऱ्या खासगी बस आणि लॉरीची आमने-सामने जोरदार धडक झाली. सोमवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला आहे. बसचा ड्रायव्हर एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
समोरा-समोर टक्कर होऊन झालेल्या या भीषण अपघातात बसमधील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये कर्नाटकच्या दोघांचा तर महाराष्ट्रातील कोल्हापूर व पुणे येथील पाच जणांचा समावेश आहे.
पोलिसांनी या अपघाताबाबत गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता की बसच्या समोरील भागाचा पूर्णत: चेंदामेंदा झाला आहे. गेल्या काही दिवसात कर्नाटकमध्ये रस्ते अपघातांत वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच धारवाडमध्येही अपघाताची घटना घडली होती. त्यात ७ जण ठार झाले होते. ही घटना ताजी असताना खासगी बसच्या भीषण अपघाताची घटना घडली.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…