नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एप्रिल महिन्यातील ‘मन की बात’ भागावर एक डिजिटल पुस्तिका प्रदर्शित केली.
ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मला पुढील आठवड्यात होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमाबद्दल असंख्य सूचना येत आहेत. तरूण त्यांची मते मोठ्या प्रमाणावर व्यक्त करत आहेत, याचा मला आनंद आहे. गेल्या महिन्याच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाविषयी एक पुस्तिका प्रसिद्ध करत आहे. त्यात कार्यक्रमात चर्चा करण्यात आलेल्या अनेक रोचक गोष्टींविषयीच्या लेखांचा समावेश आहे.”
२९ मे ला ‘मन की बात‘
पंतप्रधान नरेंद मोदी रविवार २९ मे सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात चा हा ८९ वा भाग असेल. २०२२ वर्षाचा हा पाचवा भाग असणार आहे.
नागरिक २६ मे पर्यंत ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी माय गोव्ह, नमो अप्लिकेशन किंवा 1800117800 क्रमांकाच्या माध्यमातून ध्वनिमुद्रित करून सूचना, अभिनव कल्पना आणि नव-नवीन उपक्रमांबद्दल माहिती पाठवू शकतात.
मन की बात चे थेट प्रसारण नमो आप्लिकेशन, दूरदर्शन, प्रसार भारती आणि आकाशवाणीच्या सर्व प्रदेशिक केंद्रांद्वारे, तसेच केंद्र सरकारच्या विविध सामाजिक माध्यमांद्वारे केले जाते. मुख्य भागाच्या प्रसारणानंतर हिंदी शिवाय इतर भारतीय भाषांमध्येही मन की बात चे प्रसारण आयोजित केले जाते.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…