मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना नेते यशंवत जाधव यांचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. आयकर विभाग करत असलेल्या तपासात अनेक गोष्टींचा खुलासा झाला असून काही नवीन धागेदोरे तपासात आढळून आले आहेत. मागील १० दिवसांत यशवंत जाधव यांच्याविरुद्धच्या तपासाला वेग आला आहे. यशवंत जाधव यांनी काही ज्वेलर्सकडून ६ कोटींचे दागिने रोख रक्कम मोजून खरेदी केले असल्याचे समोर आले आहे.
शिवसेनेचे मुंबईतील महत्त्वाचे नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या घरावर काही महिन्यांपूर्वी आयकर विभागाने छापा मारला होता. जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. त्यानंतर आयकर खात्याने जाधव यांच्या घरावर छापा मारला. जाधव यांच्याशी संबंधित ४१ मालमत्ता त्यात जप्त करण्यात आल्या आहेत. भायखळ्यातील ३१ फ्लॅट्स आणि वांद्र्यातील ५ कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला होता.
यशवंत जाधव प्रकरणात आयकर खात्याच्या चौकशीत आणखी काही बाबी उघड झाल्या आहेत. गेल्या १० दिवसांत तपासाला वेग आला आहे. जाधव यांच्या एकूण संपत्तींची संख्या आता ५३ वर पोहोचली आहे. यात कैसर बिल्डींगचा समावेश आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी ही इमारत खरेदी करण्यात आली. या एकट्या इमारतीतून ८० कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार उघडकीस आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या १० दिवसांत आयकर खात्याने प्रत्यक्ष ठिकाणांवर जाऊन स्पॉट तपास करत खातरजमा केली आहे. या चौकशी दरम्यान काही व्यक्तींनी शपथेवर कबुलीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यशवंत जाधव यांनी काही ज्वेलर्सकडून ६ कोटींच्या दागिन्यांची खरेदी केली. ही खरेदी संपूर्ण रक्कम रोखीने करण्यात आली. यामध्ये एका मध्यास्थामार्फत १.७७ कोटींच्या दागिन्यांची खरेदी करण्यात आली होती. या व्यवहारातही रोखीने पैसे स्वीकारल्याची कबुली या संबंधित ज्वेलर्सने दिली आहे.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…