रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरी जिल्ह्यात नवजात बालकांची खुलेआम विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून एका महिला होमगार्डच्या मध्यस्थीने मुलाची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकार हिंदुत्ववादी संघटनांमुळे चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी रत्नागिरीतून पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक तपास पो. नि. विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात नवजात बालकाची खुलेआम विक्री करणारे रॅकेट सक्रिय झाले की काय, असा प्रश्न जनतेला पडला असून हे रॅकेट आर्थिकदृष्ट्या खालावलेल्या कुटुंबाला लक्ष्य करते. १४ एप्रिल रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात एक महिला प्रसुतीसाठी दाखल झाली. या महिलेने १६ एप्रिलला एका मुलाला जन्म दिला होता. या प्रसुतीनंतर त्याच दिवशी या महिलेला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
मात्र, महिलेने जन्म दिलेल्या बाळाला विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून त्यानंतर हिंदुत्वादी संघटनांनी त्यांची पोलखोल करण्याचा चंग बांधला आणि जन्म दिलेल्या बाळाला विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका होमगार्ड महिलेच्या मध्यस्थीने मुलाची विक्री झाल्याची माहिती प्राप्त झाली असून यामध्ये १ लाख २० हजार रुपयांना या नवजात मुलाच्या विक्रीचा व्यवसाय झाल्याची माहिती समोर आली आहे. हे रॅकेट कधीपासून सक्रिय आहे याचा तपास घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सजग झाली असून त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…