पोलीस भरतीत ‘डमी’ पाठवल्याचे आणखी एक प्रकरण उघड

Share

मुंबई : पोलीस भरतीतील बोगस उमेदवार पाठवल्याचे आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. मुंबई पोलीस भरतीत डमी उमेदवार पाठवल्याचं यामुळे उघड झालंय. भोईवाडा पोलीस ठाण्यात औरंगाबाद व पुणे येथील दोन तरुणांवर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोपान शेलार आणि ज्ञानेश्वर गोवळकोंडा अशी या आरोपी़ची नावे आहेत.

सोपन याने लेखी परिक्षेसाठी कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र दुस-या दिवशी ओळखपत्रावर ज्ञानेश्वर याचा फोटो लावून लेखी परीक्षेसाठी ज्ञानेश्लावरला पाठवले. सोपान याला कांदिवली स्टेशनजवळ बजाज बीएमसी स्कूल हे सेंटर आले होते.

मात्र कागदपत्रांच्या पडताळणीत ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी सोपान शेलार याला अटक केली आहे. तर ज्ञानेश्वर गोवळकोंडा याचा शोध पोलीस घेत आहेत. या पूर्वीही अशा प्रकारचे ८ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

10 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

53 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

55 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago