मुंबई: मुंबईकरांना जानेवारीतही पाऊस अनुभवायला मिळाला. शहर आणि उपनगर परिसरात शनिवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पश्चिम उपनगरात अंधेरी गोरेगाव, कुर्ल्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडला. काही ठिकाणी तर पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत अनेक भागांमध्ये धुकेही पाहायला मिळाले.
राज्याच्या काही भागांत ७ ते १० जानेवारी या कालावधीत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्याचा प्रत्यय शनिवारी आला. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस, तर विदर्भात काही भागांत गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आह़े. राजस्थान आणि आजूबाजूच्या परिसरात चक्रीय चक्रवात कार्यरत झाला आहे. या भागातून राज्याच्या दिशेने बाष्प येत आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्रातूनही जमिनीच्या दिशेने बाष्प येत आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाने हजेरी लावली.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…