बदलापूर : पालकमंत्री एकनाथ शिंदे , बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे तसेच माजी नगरसेविका वीणा म्हात्रे हे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावेत आणि कोरोना महामारीतून मुक्तता होण्यासाठी रमेशवाडी येथील साई बाबा मंदिरात गुरुवारी महामृत्यूंजय जप महायज्ञाच्या संकल्प करण्यात आला. रमेशवाडीतील शिवसैनिक , महिला आघाडी पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक यांनी याचे आयोजन केले असल्याची माहिती विभागप्रमुख समीर घोडेकर यांनी दिली.
गेल्या दोन वर्षांपासून कित्येक कोरोनाग्रस्तांसाठी स्वत:ची व आपल्या कुटुंबाची म्हात्रे यांनी पर्वा न करता केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून ज्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती अशा गरजूंना मोफत जेवण, तांदूळ, गहू अशा वस्तू, अर्सेनिक अल्बम गोळ्या, मास्क व इतर अनेक प्रकारची मदत केली होती. त्यामुळे ते लवकरात लवकर कोरोना संसर्गातून मुक्त व्हावेत या साठी महामृत्यूंजय जप करण्यात आला. तसेच कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून या महामारीतून मुक्तता होण्यासाठीही प्रार्थना करण्यात आली.