मुंबई : ‘किसान रेल‘ उपक्रम सुरु केल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करीत आभार मानले.
ट्वीटरद्वारे फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रारंभ केलेल्या अनेक उपक्रमांपैकी ‘किसान रेल‘ हा एक उपक्रम. जालना येथून किसान रेलचा प्रारंभ झाला. ही किसान रेल आसाममध्ये जाईल. मला येथे हे आवर्जून सांगितले पाहिजे की, आतापर्यंत ज्या सुमारे 1650 किसान रेल चालल्या, त्यापैकी 75 टक्के या महाराष्ट्रातून धावल्या. पहिल्या ‘किसान रेल‘चा बहुमान सुद्धा महाराष्ट्रालाच मिळाला होता. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे खूप खूप आभार!
शेतमालाची देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात वाहतूक यामुळे सोपी होते. त्यामुळे भाजीपाला, फळे याची देशात जेथे जी मागणी आहे, तेथे त्याचा पुरवठा करता येतो. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला बाजारपेठ सहज उपलब्ध होते. सुमारे 6 लाख टन शेतमालाची वाहतूक किसान रेलने आतापर्यंत केली आहे.”
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…