मुंबई : झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली आणि लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेतील प्रमुख जोडी ओम आणि स्वीटू हि तर प्रेक्षकांची आवडती आहे. या दोघांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. या दोघांचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. मालिकेत नुकतंच ओम आणि स्वीटू यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. अखेर ओम आणि स्वीटू एकत्र आले आणि याचा आनंद प्रेक्षक आणि चाहत्यांना देखील झाला. हा आनंद एका अनोख्या पद्धतीने ओम आणि स्वीटू यांनी आपल्या चाहत्यांसोबत साजरा केला.
ओम आणि स्वीटू यांनी १९ डिसेंबर रोजी ज्या जोडप्यांची लग्न आहेत त्यांना त्यांची विवाह पत्रिका सोशल मीडियावर पाठवायचं आवाहन केलं आणि त्यातील एका जोडीच्या लग्नात उपस्थिती दर्शवण्याचं प्रॉमिस केलं आणि त्यांनी केलेल्या प्रॉमिस प्रमाणेच सौरभ आणि जुही यांच्या लग्नात ओम आणि स्वीटू यांनी हजेरी लावली आणि या नवदाम्पत्याला त्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांना आपल्या लग्नात पाहून या जोडप्याला सुखद धक्काच बसला आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. चाहते आणि कलाकार यांच्यातील नातं अजून घट्ट करण्याचा ओम आणि स्वीटू यांचा हा प्रयत्न नक्कीच उल्लेखनीय होता असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…