कलाकार आणि मनोरंजन हे जसं सहज-सोपं समीकरण आहे तसंच किचन आणि कलाकार हे समीकरण जुळून येईलच असं नाही. किचनमध्ये पाककलेची कसोटी लागलेली असताना कलाकार किचनमध्ये काय कल्ला करतात हे प्रेक्षकांना झी मराठीवर नुकतंच भेटीला आलेल्या ‘मस्त मजेदार – किचन कल्लाकार’ या कार्यक्रमातून पाहायला मिळतंय. कलाकारांच्या किचनमधील या कल्ल्यामुळे प्रेक्षकांचं मात्र पुरेपूर मनोरंजन होतंय. आगामी भागात आनंद इंगळे, वंदना गुप्ते आणि जयवंत वाडकर यांच्यात चुरस रंगणार आहे. महाराज म्हणजेच प्रशांत दामले हे या तिन्ही कलाकारांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करायचं आव्हान देणार आहेत. अभिनेता आनंद इंगळे हा फणसासारखा आहे असं प्रशांत दामले म्हणाले. बाहेरून कडक आणि आतून मऊ आणि गोड. त्यामुळे प्रशांत दामले यांनी आनंद इंगळे यांना फणसाची भाजी करण्याचं आव्हान दिलं. हे आव्हान आनंद यांनी कसं पेलवलं हे तर प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल पण हि भाजी करताना जे साहित्य घ्याव लागतं त्यात आनंद खूप महत्वाची सामग्री विसरले ते म्हणजे फणस. आता फणसाची भाजी करताना फणसच नसेल तर आनंद इंगळे हे चॅलेंज कसं पार पाडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. फणस हे प्रमुख साहित्य मिळवण्यासाठी आनंद इंगळे यांना कुठल्या दिव्यातून जावं लागणार, त्याचप्रमाणे वंदना गुप्ते आणि जयवंत वाडकर यांना महाराज काय पदार्थ करायला सांगणार आणि तो पदार्थ करताना त्यांची काय तारांबळ उडणार हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…