मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ हा रिऍलिटी शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. कालच्या भागामध्ये मीनल ‘Ticket To Finale’ च्या टास्कमधून बाहेर पडली. आता फिनालेसाठी चुरस रंगणार आहे ती उत्कर्ष, मीरा आणि विशाल….
‘तिकीट टू फिनाले’मध्ये पोहचण्यासाठी हे तिघही जीवाचं रान करतील यात शंका नाही. त्यामुळे आता या शोमधली रंगत अधिकच वाढत चालली आहे. इतके दिवस अनेक टास्कमधून स्वत: ला सिध्द करत हे तीघ इथवर येऊन पोहचले आहेत. आता तिकीट टू फिनाले म्हणजे जणू बिग बॉसच्या ट्रॉफीच्या अगदी जवळ जाणं. ही ट्रॉफी हातात घेण्यात आणि या तिस-या सिझनवर विजेता म्हणून आपल्या नावाचं शिक्कामोर्तब करण्यात हे तिघेही उत्सुक आहेत.
या तिघांपैकी कोणत्या सदस्याला मिळणार ‘Ticket To Finale’ आणि कोण पोहोचणार अंतिम आठवड्यात हे पाहणं औत्सुकतेचं ठरेल.
तसंच ‘Ticket To Finale’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘Ticket To Finale’ चे टास्क काही खास पाहुण्यांसोबत रंगणार आहेत. म्हणजेच घरात जाणार आहेत तीन खास पाहुणे. अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर. झोंबी सिनेमाच्या निमित्ताने हे तिघं बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. आता हे तिघं बिग बॉसच्या घरात जाणार असल्यामुळे प्रेक्षकांना एन्टरटेन्मेंटचा डबल डोस मिळणार हे नक्की.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…