स्मॉल स्क्रीनवर मनोरंजनाचा डबल धमाका
झी मराठीवर येत्या १९ डिसेंबरला‘मन झालं बाजिंद’,‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकांचे १ तासांचे विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला यणार आहेत आणि याच महाएपिसोड च्या साक्षीने ‘देवमाणूस २’ चा महाआरंभ होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात डिसेंबर महिन्यात हळदीच्या पिकाची पूजा केली जाते, या पार्श्वभूमीवर हा महाएपिसोड रंगणार आहे. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अशा पद्धतीने हळदीची पूजा दाखवली जाणार आहे,
या महाएपिसोडमध्ये विधाते कुटुंबातील सर्वजण हळदीच्या पूजेची तयारी करून शेतात जातात. दुसरीकडे राया कारखान्यातील भेसळ प्रकरणात गुन्हेगार असलेल्या ह्रतिक आणि पप्याला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देणार का? सोबतच राया कृष्णाला मानानं तिचं कारखान्यातील पद परत करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
‘येऊ कशी तशी मी नांदायला‘मध्ये प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण स्वीटू आणि ओमच लग्न पार पडणार आहे. मालिकेत सध्या आनंदी आनंद दिसतोय आणि त्याचसोबत ओम व स्वीटूच्या लग्नाची लगबग देखील चालू आहे. ओम आणि स्वीटू खूप खुश आहेत. कारण इतक्या कठीण प्रसंगांना तोंड देऊन शेवटी ते दोघे एकत्र येणार आहेत. कोकणच्या मातीत रंगलेला हा ओम आणि स्वीटूचा लग्नासोहोळा हे या १ तासाच्या विशेष भागाचं खास आकर्षण असणार आहे.
या दोन मालिकांसोबतच प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते आणि ज्या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं असा ‘देवमाणूस २‘ चा महाआरंभ होणार आहे.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…