कोल्हापूर (प्रतिनिधी): आग लावण्याचे धंदे बंद करावेत आणि शिवसेनेला लागलेल्या गळतीकडे अधिक लक्ष द्यावे. नुसती टीका करून पक्ष वाढणार नाही, असा सल्ला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत दिला आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपने देशातील ऐक्य तोडण्याचे काम केले. तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीचा एकही नेता आता भाजपमध्ये नसल्याचे विधान संजय राऊत यांनी केले आहे, त्यावर प्रतिक्रिया काय असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. त्यावर, मी भाजपमध्ये आहे. कोणकोणापेक्षा लहान आहे. याच मूल्यमापन मी करणार नाही, असे म्हणत राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले.
म्हाडा परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत राज्याचा प्रमुखच सक्षम नसेल तर दुसरे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर राज्यात सरकार अस्तित्वात आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच गेल्या दोन वर्षात राज्य दहा वर्षांनी मागे गेले आहे. म्हाडा पेपरफुटीवर तसेच राज्यातील एकूणच पेपरफुटीच्या प्रकरणावर भ्रष्टाचार झाल्याचे राणे यांनी म्हटले.
राज्यात सरकार अस्तित्वातच नाही. शेतकऱ्यांचा, मजुरांचा, विद्यार्थ्यांचे प्रश्न अनुत्तरीत आहेत. विकास ठप्प झाला आहे. सरकारचा प्रमुखच नसेल तर यंत्रणेवर कोणाचा अंकुश असणार, असा सवाल देखील नारायण राणे यांनी उपस्थिती केला आहे. राज्याची परिस्थिती सध्या कठीण आहे. महविकास आघाडीमुळे राज्य १० वर्षे मागे गेले आहे. सरकारवर कोणाचा अंकुश राहिला नाहीय. यामुळे पैसे देऊन पेपरफुटत आहेत. यामुळे भ्रष्टाचार देखील वाढला आहे, असे देखील नारायण राणे म्हणाले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…