मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालिका सतर्क झाली असून मुंबईत आता कोरोना चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. यासाठी पालिका रॅपिड अँटिजेन चाचण्यांचे २० लाख किट खरेदी करणार आहे. या चाचण्यांमुळे अवघ्या अर्ध्या तासात संसर्ग झाला की नाही? याची माहिती मिळणार आहे.
Omaicron: Municipal tests to be increased
ओमायक्रॉनमुळे जगभरात चिंता पसरली असताना मुंबईत पालिकेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत ३ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर पालिकेतर्फे आता कोरोना चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. यासाठी पालिका २० लाख अँटिजेन चाचण्यांचे किट खरेदी करणार आहेत. हे एक किट पालिकेला ९ रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या किटमुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही? याची माहिती अवघ्या अर्ध्या तासात मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर उपचार करणे शक्य होणार आहे.
या चाचण्या गर्दीच्या ठिकाणी होणार असून मॉल, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मार्केट परिसर अशा ठिकाणी चाचण्या होणार आहेत.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…