नवी दिल्ली : बाबरी मशीद विध्वंसाला सोमवारी २९ वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मथुरेत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती.
अखिल भारत हिंदू महासभेने शाही इदगाह मशिदीच्या आत असलेल्या जन्मस्थानी भगवान कृष्णाची मूर्ती स्थापित करण्याची परवानगी मागितल्यानंतर मथुरेमध्ये मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले.
“आम्ही जवळपास ३,००० सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहे. शहरात आज होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची आम्हाला खात्री देण्यात आली आहे. परंतु आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज असून परिसर सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करू,” असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक गौरव ग्रोव्हर यांनी सांगितले.
मशिदीकडे जाणाऱ्या रस्त्यांना जास्तीत जास्त सुरक्षा पुरविण्यात आली. आज स्थानिक लोकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. तणावपूर्ण परिस्थितीमुळे पोलिसांनी प्रवासी सूचना जारी केल्या असून सात मार्गांवर प्रवास करण्यास मनाई केली आहे. दींग गेट आणि मंदिर परिसरात वाहतूक वळवण्यात आली आहेत.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…