नवी मुंबई (प्रतिनिधी) : मनपाचे झीरो कचरा कुंडी अभियान संपण्याच्या मार्गावर असून, तुर्भे येथील मनपा विद्या मंदिरासमोरच कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे विद्यार्थ्यांसहित शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळेसमोर कचरा टाकण्यावर प्रतिबंध आणावा, अशी मागणी सेना शाखाप्रमुख सिद्धाराम शिलवंत यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.
स्वच्छता अभियानांतर्गत मनपाकडून यावर्षी झीरो कचरा कुंडी अभियान राबविले होते. कचरा घंटा गाडीद्वारे क्षेपणभूमीमध्ये टाकला जात होता; परंतु घंटा गाडी वेळेवर येत नसल्याने शाळेसमोर कचरा टाकला जात आहे. यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे.
या ठिकाणी कचरा वाहतूक करणारी वाहने नियोजित वेळेत सुरू करण्यात येतील. तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. – सुधाकर वडजे, स्वच्छता अधिकारी, तुर्भे
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…