मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात विरोधकांवर केलेल्या टीकेचा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्यात विचारांचे सोनं लुटायचे. मात्र उद्धव ठाकरे महाराष्ट्र लुटायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
ते मुख्यमंत्र्यांसारखे कधीच बोलू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या अंगी असावे लागतात, तसे गुण त्यांच्यामध्ये नाहीत. ते वायफळ बडबड करतात. त्यांच्या विचारांची मर्यादाच तेवढी आहे. त्यामुळे ते दुसरे काही बोलू शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
दसरा मेळाव्यात पक्षप्रमुखाचे भाषण होते की रडगाणं होते? नेहमीची किर-किर, आदळ-आपट पण निष्पन्न शून्य. म्हणे मी राजकारणातून बाजूला झालो असतो! बरे झाले असते महाराष्ट्र वाचला असता, असे सांगून, चायनामध्ये बनवलेला पक्षप्रमुख वाटतो, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…