कोकणी बाणा : सतीश पाटणकर
कोरोना व्हायसरमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने अर्थव्यवस्था पुरती मंदावली आहे. कोरोनाशी लढतात अर्थव्यवस्थेला चालना द्यावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात म्हटले होते. कोरोनाच्या संकटाला संधी म्हणून पाहायचे आहे. आत्मनिर्भर भारत या अभियानामुळे देशभरात नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. यासाठी त्यांनी २० लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले.
विशेष आर्थिक पॅकेजमध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ योजना जाहीर करण्यात आली. ही योजना पाच खांबावर उभारली जाईल, असे म्हटले गेले. यातील पहिला खांब अर्थव्यवस्था, दुसरा खांब इन्फ्रास्ट्रचर, तिसरा खांब आपली व्यवस्था तीही तंत्रज्ञानावर आधारित, चौथा खांब लोकसंख्याशास्त्र आणि पाचवा खांब मागणी, MSME क्षेत्राला कोणत्याही गॅरंटीशिवाय ३ लाख कोटी रु.चे कर्ज उपलब्ध होईल. समाजातील अनेक घटकांशी संवाद साधून हे आर्थिक पॅकेज तयार करण्यात आले आहे. या पॅकेजद्वारे देशातील विकास वाढवण्याची योजना आहे. त्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ योजना म्हटले आहे.यामध्ये सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या व्याख्येत बदल करून त्यांच्या गुंतवणूक व वार्षिक उलाढालीची मर्यादा वाढविण्यात आली आहे. या व्याख्येनुसार सूक्ष्म उद्योग १ कोटी रुपयांची गुंतवणूक व ५ कोटी रु.ची वार्षिक उलाढाल, लघू उद्योग १० कोटी रु. गुंतवणूक आणि ५० कोटी रु. उलाढाल, तर मध्यम २० कोटी रु. गुंतवणूक, १०० कोटी रु.ची उलाढाल अशी व्याख्या करण्यात आली आहे. तसेच ५० हजार कोटी रुपयांचा एक विशेष निधीही जाहीर करण्यात आला आहे. याचा फायदा त्या उद्योगांना होईल. जे चांगली कामगिरी करत आहेत, पण निधीअभावी त्यांना अडचणी येत आहेत, अशा उद्योगासाठी हा निधी वापरला जाईल.
सरकार यात १० हजार कोटी रु.ची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या २०० कोटी रुपयांपर्यंतच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर न काढण्याची घोषणा करण्यात आली. लघू आणि कुटिर उद्योगांसाठी सहा मोठ्या योजना, लघू आणि कुटिर उद्योगांसाठी कोणत्याही गॅरंटीशिवाय ३ लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार, ४५ लाख लघू उद्योगांना ३१ ऑक्टोबरपासून याचा फायदा मिळणार, अशा प्रकारे ही माहिती देण्यात आली आहे. अशा प्रकारे ही आत्मनिर्भर भारत योजना केंद्राने जाहीर केली आहे.
सर्व व्यवसायामध्ये ई-प्रणालीचा वापर करावा लागेल. आपला व्यवसाय व्होकल ते लोकल आणि लोकल ते ग्लोबल होण्यासाठीचा हा कसोटीचा काळ असेल. मार्केटमध्ये तुमचा माल खरेदी करण्यासाठी ग्राहकाच्या हातीही पैसा असणे आवश्यक असेल. आत्मनिर्भर योजनेतून नवीन उद्योग सुरू होतील. बेरोजगार व्यक्तींना काम मिळेल, पण कोणत्याही व्यवसायाचे साधे गणित आहे की, पहिली किमान दोन वर्षं तरी तुम्हाला व्यवसाय नो-प्रॉफिट, नो-लॉस या तत्त्वावर करावा लागतो.
कोरोनाच्या काळात आत्मनिर्भर भारत योजना आणि तरुण उद्योजकांना संधी म्हणून पाहिले, तर नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी ही चांगली संधी आहे. पण कोरोनाच्या काळात भारतातच नव्हे, तर आशिया पॅसेफिक देशात तरुण उद्योजकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत केंद्र सरकार व्यवसाय सुरू करणाऱ्यांना १० लाख रुपयांची मदत देत आहे. या मागील उद्देश आपल्याला आपल्या पायावर उभे करणे हा आहे. कोरोना साथीच्या रोगामुळे देशातील व्यापार क्षेत्राचा वेग मंदावला आहे. या काळात अनेक व्यवसाय रखडले आहेत, तर काहींना आपला व्यवसाय बंद करावा लागला. मात्र, आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत केंद्र सरकार व्यवसाय सुरू करणाऱ्यांना १० लाख रुपयांची मदत देत (Business Opportunity) आहे. यामागील उद्देश आपल्याला आपल्या पायावर उभे करणे हा आहे. कोरोना काळात बंद पडलेले व्यावसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार पुन्हा लोकांना मदत (Business loan) करत आहे.
आपल्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत अभिनायांतर्गत (Atmanirbhar Bharat Abhiyan) आपल्याला मदत करेल. या अतर्गत आपण नवीन व्यवसाय सुरू करू शकता किंवा आपला जुना व्यवसाय पुन्हा सुरू करू शकता. दोन्ही प्रकारच्या व्यवसायासाठी केंद्र सरकारकडून मदत केली जात आहे.
केंद्र सरकारने पंतप्रधान मुद्रा योजना (pm mudra loan yojana) सुरू केली आहे. ही योजना अशा लोकांसाठी अधिक फायदेशीर आहे, ज्यांच्याकडे कर्ज घेण्यासाठी बँकेने निश्चित केलेल्या अटी पूर्ण करण्याची क्षमता नसते. या योजनेंतर्गत देशातील कोणताही नागरिक ज्याच्याकडे कुटिर उद्योग किंवा कोणतीही भागीदारी कंपनी असेल तो कर्ज (mudra loan) घेऊ शकतो.
पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत तीन टप्प्यांत कर्ज दिले जाते. सरकारने यामध्ये शिशू लोन, किशोर लोन आणि तरुण लोन अशी विभागणी केली आहे.
शिशू कर्ज योजना : या अंतर्गत दुकान उघडण्यासाठी ५०,००० रुपयांपर्यंत कर्ज घेतले जाऊ शकते.
किशोर कर्ज योजना : या योजनेंतर्गत ५०,००० रुपयांपासून ते ५ लाखांपर्यंत कर्ज घेतले जाऊ शकते.
तरुण कर्ज योजना : जर तुम्हाला लघू उद्योग स्थापित करायचा असेल, तर तुम्ही ५ लाख रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता.
पंतप्रधान मुद्रा योजना लघू उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी आहे. जर तुम्हाला एखादा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्या अंतर्गत तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही. या योजनेंतर्गत लघुउद्योग असेंब्लिंग युनिट्स, सर्व्हिस सेक्टर, दुकानदार, फळ / भाजी विक्रेते, ट्रक ऑपरेटर, फूड सर्व्हिस युनिट्स, रिपेअर शॉप्स, मशीन ऑपरेटर, लघू उद्योग, कारागीर आणि फूड प्रोसेसिंग युनिटसाठी कर्ज घेऊ शकता.
कोठे मिळते कर्ज?
पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत सरकारी बँकांकडून कर्ज घेतले जाऊ शकते. ग्रामीण बँकांदेखील यासाठी कर्ज देत आहेत. सहकारी बँकांकडूनही कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. आरबीआयने अधिकृत केलेल्या २७ बँका या योजनेंतर्गत कर्ज देऊ शकतात. यामध्ये खासगी क्षेत्रातील १७ बँका, ३१ ग्रामीण बँका, ४ सहकारी बँका, ३६ मायक्रो-फायनान्स बँका आणि २५ बिगर-बँकिंग क्षेत्रातील फायनान्स कंपन्या आहेत. याविषयी अधिक माहितीसाठी आपण mudra.org.in वर लॉग इन करू शकता. येथे तुम्हाला योजनेची संपूर्ण माहिती मिळेल.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…