दुबई (वृत्तसंस्था) :आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या २०२१ हंगामाची अंतिम लढत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) दुबई क्रिकेट मैदानावर रंगेल. माजी विजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील मेगा फायनलमध्ये बाजी मारताना कुठला संघ ट्रॉफी पटकावत माध्यमातून आयपीएलचे सोने लुटणार, याची उत्सुकता जगभरातील क्रिकेटचाहत्यांमध्ये आहे.
यंदाच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा संघ इयॉन मॉर्गन आणि सहकाऱ्यांशी दोन हात करेल. या मोसमाचा विचार करताना चेन्नईने १४पैकी ९ सामने जिंकताना १८ गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. वास्तविक पाहता सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला नसता, तर सुपरकिंग्जना पहिला क्रमांक राखण्यात प्रयास पडले नसते. मात्र, बाद फेरीतील (प्ले-ऑफ) क्वॉलिफायर १मध्ये त्यांनी टॉपला असलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळ उंचावला आणि १४व्या हंगामात नवव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. २०१०, २०११ आणि २०१९ अशी तीन जेतेपद मिळवलेल्या चेन्नईला दोन हंगामांनंतर आणखी एक ट्रॉफी पटकावण्याची संधी आहे. यंदा दोन्ही सामन्यांत चेन्नईने कोलकाताला हरवले आहे. त्यामुळे आमने-सामने पाहता धोनीच्या टीमचे पारडे जड आहे.
कोलकात्याने साखळीमध्ये १२पैकी सात सामने (१४ गुण) जिंकत गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले. साखळील सलग दोन विजयांनंतर एलिमिनेटरमध्ये बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स तसेच क्वॉलिफायर २मध्ये दिल्ली कॅपिटल्सला हरवत त्यांनी विजयाचा चौकार लगावला आहे. क्वॉलिफायर २मध्ये ऋषभ पंत आणि सहकाऱ्यांना हरवताना थोडी मेहनत करावी लागली तरी, विजय हा विजय असतो. कोलकात्याच्या खात्यात २०१२ आणि २०१४ अशी दोन जेतेपदे आहेत. आयपीएलमध्ये ट्रॉफी मिळवलेला तिसरा सर्वात यशस्वी संघ असलेल्या नाइट रायडर्सनी सात वर्षांनी फायनल प्रवेश केला आहे. त्यांच्या आवाक्यात तिसरे जेतेपद आहे. नऊ वर्षांपूर्वीच्या फायनलमधील विजय त्यांचा आत्मविश्वास उंचावणारा असेल. मात्र, तो इतिहास आहे. कोलकाता संघाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर बाजी मारली आहे. प्रतिस्पर्धी चेन्नई संघाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल.
चेन्नईसाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा फॉर्म जमेची बाजू आहे. त्याने १० सामन्यांत ४८६ धावा फटकावल्या आहेत. मागील ५ डावांमध्ये त्याने एक शतकही झळकावले आहे. तसेच दिल्लीविरुद्ध ७० धावांची खेळताना सातत्य राखले आहे. फाफ डु प्लेसिस ठिक असला तरी अनुभवी रॉबिन उथप्पाला गवसलेला सूर पाहता सुपरकिंग्जची फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे. सुरेश रैनाच्या जागी मागील तीन सामन्यांमध्ये संधी मिळालेल्या उथप्पाला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. मात्र, क्वॉलिफायर १मध्ये ऋतुराजसह त्याने मोठी भागीदारी केली. चेन्नईची मधली फळी अपेक्षित खेळत नाही. मात्र, कर्णधार महेंद्रसिंग धोनीसारखा फिनिशर तसेच अष्टपैलू रवींद्र जडेजा, ड्वायेन ब्राव्हो तसेच शार्दूल ठाकूर पाहता माजी विजेत्यांच्या फलंदाजीत डेप्थ आहे. मध्यमगती शार्दूलने गोलंदाजीची धुरा सांभाळली असली तरी अन्य सहकाऱ्यांकडून त्याला समर्थ साथ अपेक्षित आहे. महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून रिटायर होणार असल्याने कर्णधाराला ट्रॉफीसह विजयी निरोप देण्यासाठी चेन्नई संघ उत्सुक आहे. त्यामुळे सर्वच क्रिकेटपटूंची जबाबदारी वाढली आहे.
बाद फेरीत अनुक्रमे बंगळुरू आणि दिल्लीवर विजय मिळवत कोलकाता संघाने फायनल प्रवेश केला आहे. सलामीवीर शुबमन गिल, राहुल त्रिपाठी तसेच नवोदित वेंकटेश अय्यरने सातत्य राखले तरी तुलनेत कमी आव्हान असूनही माजी विजेत्यांना विजयासाठी झगडावे लागले. कर्णधार इयॉन मॉर्गन तसेच यष्टिरक्षक, कर्णधार दिनेश कार्तिकसाठी फॉर्म मिळवताना सांघिक कामगिरीत योगदान देण्याची शेवटची संधी आहे. वरुण चक्रवर्ती आणि लॉकी फर्ग्युसनने मध्यमगती गोलंदाजीचा मारा सांभाळला आहे. त्यांना ऑफस्पिनर सुनील नरिनची चांगली साथ लाभली आहे. मात्र, चेन्नईविरुद्ध कोलकाताच्या सर्वच गोलंदाजांचा कस लागेल.
आयपीएलच्या फायनल्सचा विचार करताना चेन्नई आणि कोलकाता २०१२मध्ये आमनेसामने आले होते. त्यात कोलकात्याने बाजी मारली होती. धोनीचा संघ या पराभवाचा बदला घेतो की, मॉर्गनची टीम यावेळीही वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
वेळ : सायं. ७.३० वा….
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…