मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांच्याकडून मोठी चूक झाली. त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नवघरे हे टीकेच्या रडारवर आले आहेत. याबाबत आता माजी खासदार, महाराष्ट्र भाजपचे सचिव नीलेश राणे यांनी नवघरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी तोफ डागली आहे.
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांना भर चौकात फटके मारले पाहिजेत. राष्ट्रवादीवाल्यांची जिरवल्या शिवाय पर्याय नाही. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिंमत असेल तर ‘याची’ पक्षातून हकालपट्टी करा. औरंगजेबच्या औलादी आहेत या पक्षात,’ अशी टीका नीलेश राणे यांनी केली आहे.आमदार नीतेश राणे यांनीही नवघरे यांचा तो फोटो ट्वीट करून राष्ट्रवादीवर शरसंधान साधले आहे. ‘याला सत्तेचा माज म्हणतात. हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत,’’असे त्यांनी म्हटले आहे.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…