अरे पुण्यात चाललेय काय? गुंडांना पकडण्यासाठी बक्षिसांची खैरात

Share

पिस्तूल सापडल्यास दहा हजार, कोयता बाळगणार्‍याला पकडल्यास तीन हजार

याशिवाय वाँटेड, फरार आरोपींना पकडल्यास देखील दिले जाणार बक्षीस

पुणे : पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसात कोयता गँगने धूमाकुळ घातला असून फायरींगच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. शहरात गुंडांचा वाढता धूमाकुळ पाहता पोलिसांसमोर आव्हान उभे राहीले असून या गुंडांना पकडणार्‍या पोलिसांवर आता बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे.

यानुसार पिस्तूल जवळ बाळगणार्‍या गुंडाला पकडल्यास दहा हजार, तर कोयता बाळगणार्‍याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय वाँटेड, फरार आरोपींना पकडल्यास देखील हजारो रुपयांची बक्षीसे देण्यात येणार असून पुणे पोलिसांची ही बक्षीस योजना चांगलीच चर्चेत आली आहे.

पुणे पोलीस आयुक्तालयातील पश्चिम आणि पुर्व प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तांनी ही बक्षीस योजना जाहीर केली आहे.

अशी आहे बक्षिसांची योजना

  • शस्त्र अधिनियम कलम ३, २५ साठी दहा हजार रुपये
  • शस्त्र अधिनियम कलम ४, २५ साठी तीन हजार रुपये
  • फरारी आरोपीस पकडल्यास १० हजार रुपये
  • पाहीजे आरोपी पकडल्यास ५ हजार रुपये
  • मोक्कातील आरोपी पकडल्यास ५ हजार रुपये
  • एमपीडीएतील आरोपी पकडल्यास ५ हजार रुपये

Recent Posts

Loksabha Election 2024: रायबरेली येथून राहुल गांधी, अमेठीमधून केएल शर्मा उमेदवार, काँग्रेसची घोषणा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा अखेर करण्याती आली…

45 mins ago

घाबरू नका! फोन चोरी झाल्यास Paytm आणि Google Pay असे करा डिलीट

मुंबई: आजकाल प्रत्येक कामे ही मोबाईलनेच केली जातात. विचार करा की जर तुमच्याकडे फोन नसेल…

2 hours ago

Dream: नशीब बदलतील स्वप्नात दिसलेल्या या ३ गोष्टी

मुंबई: स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्ती नेहमी आनंदी जीवन जगतो.…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक ३ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र शततारका. योग ब्रम्हा. चंद्र राशी कुंभ…

4 hours ago

विकासकामांच्या पाठबळावर मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर

देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…

7 hours ago

ठाकरेंची भाषणे म्हणजे ‘सुक्या गजाली’

माझे कोकण: संतोष वायंगणकर देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक प्रचार प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने…

8 hours ago