स्कूलनेट आणि इंग्लिशहेल्परकडून महाराष्ट्रातील ९०,००० शाळांमध्ये रीडटूमी® लाँच

Share

मुंबई (हिं.स) : स्कूलनेट या शाळांना तंत्रज्ञान-आधारित शैक्षणिक सेवा देणा-या अद्वितीय व आघाडीच्या एडटेक कंपनीने आज महाराष्ट्रातील ९०,००० शाळांमध्ये रीडटूमी® लाँच करण्यासाठी इंग्लिशहेल्परसोबत सहयोग केल्याची घोषणा केली आहे. रीडटूमी® हे एआय सक्षम तंत्रज्ञान आहे, जे इंग्रजीमधील अभ्यासक्रमाच्या बहुसंवेदी वाचनामध्ये मदत करते. इंग्लिशहेल्पर ही इम्पॅक्ट फर्स्ट सोशल एंटरप्राईज आहे, जी जगभरातील लोकांना इंग्रजीवर इच्छित प्रभुत्व संपादित करण्यामध्ये सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास कटिबद्ध आहे.

२०१४ मध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर प्रथम महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील १२५ शाळांमध्ये सुरू करण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि खूपच प्रभावी ठरला. यामुळे २०१६ मध्ये युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी) यांच्या पाठबळासह ३७२० शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यास प्रेरणा मिळाली. २०१८ पर्यंत करण्यात आलेल्या स्वतंत्र मूल्यांकनामधून पुष्टी मिळाली की, उपक्रमाशी संलग्न झालेल्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन व आकलनामध्ये लक्षणीयरित्या सुधारणा झाली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम ९०,००० शाळांपर्यंत विस्तारित करण्यास मान्यता दिली.

रीडटूमी® ची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

१. हे एकमेव तंत्रज्ञान आहे, जे विहित इंग्रजी पाठ्यपुस्तकांचे बहु-संवेदी वाचन व आकलनामध्ये मदत करते.

२. इंग्रजी पाठ्यपुस्तकांच्या अध्यापनासाठी शिक्षक शाळेमध्ये वर्गात या तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकतात.

३. हे लोकेशन अॅग्नोस्टिक आहे, जेथे विद्यार्थी कुठेही त्यांच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकांच्या वाचनाचा सराव करण्याकरिता अँड्रॉईड डिवाईसेसवर रीडटूमी® डाऊनलोड करू शकतात.

स्कूलनेट व इंग्लिशहेल्पर एकत्रित राज्यभरात रीडटूमी® ची अंमलबजावणी करण्यासाठी प्रादेशिक शैक्षणिक प्राधिकरण, औरंगाबाद तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डीआयईटीएस) यांच्यासोबत सहयोगाने काम करत आहेत. रीडटूमी® वापरण्यासंदर्भात शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा पहिला टप्पा २५ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आला आणि तेव्हापासून १००,००० हून अधिक शिक्षक व १५०,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना स्कूलनेट इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. आरसीएम रेड्डी म्हणाले, ”महामारीचा विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेवर लक्षणीय सकारात्मक परिणाम झाला आहे. रीडटूमी® बहुसंवेदी सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांना इंग्रजी पाठ्यपुस्तकांचे वाचन व आकलनामध्ये मदत करते आणि आज ते काळाची गरज आहे. आम्ही आर्थिक पार्श्वभूमी न पाहता सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देण्याशी कटिबद्ध आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून आमचा महाराष्ट्रभरातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा मनसुबा आहे.”

Recent Posts

उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’

मनसे नेते अमेय खोपकरांची टीका मुंबई : मुंबईतील राजकारणात महत्त्वाचे केंद्र असणाऱ्या शिवाजी पार्कवरील सभेवरून…

2 hours ago

कोविशील्ड साइड इफेक्ट्स: नागरिकांना लस नुकसान भरपाईसाठी सुप्रीम कोर्टात याचिका

नवी दिल्ली : कोविड लसींचे दुष्परिणाम शोधण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्ली येथील…

3 hours ago

परिस्थितीनुसार निर्णय घेतल्याने मुंबईत तीन नवे उमेदवार : फडणवीस

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे जागावाटप अखेर जाहीर झाले आहे. जागावाटपादरम्यान, महायुतीमधल्या भाजप आणि…

3 hours ago

Central Railway : लोकलच्या गर्दीचा सात दिवसात तिसरा बळी!

डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान गर्दी ठरली जीवघेणी डोंबिवली : उपनगरात रहाणाऱ्या चाकरमान्यांसाठी लोकल ट्रेन…

3 hours ago

T20 World Cup : टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ दिग्गज खेळाडूंना मिळाला डच्चू

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ बुधवारी जाहीर करण्यात आला.…

4 hours ago