Tuesday, June 18, 2024
Homeताज्या घडामोडीRBI Imposes Penalty : आरबीआयचा ॲक्शन मोड! 'या' सरकारी बँकांना ठोठावला कोट्यवधींचा...

RBI Imposes Penalty : आरबीआयचा ॲक्शन मोड! ‘या’ सरकारी बँकांना ठोठावला कोट्यवधींचा दंड

मुंबई : नव्या आर्थिक वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नवी नियमावली जाहीर केली होती. त्यासोबत देशातील अनेक बँकांवरही नियम लादले. मात्र वारंवार सूचना देऊनही काही बँकांनी नियम धाब्यावर बसवल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये दोन सरकारी बँकांचा समावेश असून नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी आरबीआयने या बँकांना दणका दिला आहे. या सरकारी बँकांवर आरबीआयने ॲक्शन मोड जारी केला असून कोट्यावधींचा दंड ठोठावला आहे. (RBI Imposes Penalty)

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) आणि सोनाली बँकेवर (Sonali Bank) मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने सेंट्रल बँक ऑफ इंडियाला १.४५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, तर सोनाली बँकेवर ९६.४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आर्थिक नियमांचे पालन न केल्यामुळे या दोन बँकांवर आरबीआयने कारवाई केली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेवर कोटींचा दंड

आरबीआयकडून आर्थिक स्थितीच्या संदर्भात सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मूल्यांकनाची (ISE 2022) तपासणी करण्यात आली होती. त्याआधारे बँकेला नोटीस पाठवण्यात आली होती. ज्यामध्ये नियमांचे पालन न केल्याबद्दल बँकेला आर्थिक दंड का लावला जाऊ नये हे स्पष्ट करण्यास सांगितले होते. मात्र बँकेने प्रतिसाद न दिल्याबद्दल आरबीआयने सेंट्रल बँक ऑफ इंडियावर कोटींचा दंड ठोठावला आहे.

त्याचबरोबर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने सबसिडी म्हणून सरकारकडून मिळालेल्या निधीच्या बदल्यात कॉर्पोरेशनला कर्ज दिले होते. अनाधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहारांच्या काही प्रकरणांमध्ये समाविष्ट असलेली रक्कम ग्राहकांच्या खात्यांमध्ये निर्धारित वेळेत जमा झाली नाही, असेही आरबीआयने सांगितले आहे.

सोनाली बँकेला ९६.४ लाख दंड

आरबीआयने सोनाली बँक पीएलसीला KYC सूचना, २०१६ सह काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल ९६.४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये, नियमांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -