Friday, March 29, 2024
Homeक्रीडारायबरेलीच्या स्टेडियमला प्रसिद्ध महिला हॉकीपटूचे नाव

रायबरेलीच्या स्टेडियमला प्रसिद्ध महिला हॉकीपटूचे नाव

रायबरेली (वृत्तसंस्था) : भारतीय संघाची स्टार हॉकीपटू राणी रामपालचा अनोखा सन्मान करण्यात आला आहे. रायबरेली येथील हॉकी स्टेडियम आता राणी रामपालच्या नावे ओळखले जाणार आहे. मॉडर्न कोच फॅक्टरी (MCF) रायबरेलीने या हॉकी स्टेडियमचे नाव बदलून ‘राणी’ज गर्ल्स हॉकी टर्फ’ असे ठेवले आहे.

राणी रामपालने स्वत: फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. या फोटोमध्ये ती इतर स्टाफ सदस्यांसह स्टेडियमचे उद्घाटन करताना दिसत आहे. या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये राणीने लिहिले आहे की, माझा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द खूप कमी वाटतात. मॉडर्न कोच फॅक्टरी रायबरेलीने हॉकी स्टेडियमचे नाव बदलून “राणी’स गर्ल्स हॉकी टर्फ असे केल्याने हॉकीमधील माझ्या योगदानाचा सन्मान केला आहे. “माझ्या नावावर स्टेडियम असणारी मी पहिली महिला हॉकीपटू ठरल्याने हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -