मन की बात साठी विचार पाठवीत राहा : पंतपधान नरेंद मोदी

Share

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्याच्या मन की बात संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना विशेष आवाहन केले.ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” २६ डिसेंबर रोजी आयोजित आणि २०२१ वर्षाच्या अंतिम मन की बात साठी मला अनेक कल्पना आणि माहिती प्राप्त होते आहे. या सूचनांमध्ये विविध विषय आणि विविध क्षेत्रात खऱ्या अर्थाने बदल घडविण्यासाठी जे तळागाळात कार्यरत आहेत अशा अनेकांच्या कथांचा समावेश आहे. आपले विचार पाठवीत राहा. ”

पंतपधान नरेंद मोदी रविवार २६  डिसेंबर सकाळी ११ वाजता ‘मन की बात ‘ कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात चा हा ८४ वा भाग असेल. २०२१ वर्षाचा हा शेवटचा भाग असणार आहे. २४ डिसेंबर दरम्यान ‘मन की बात ‘ कार्यक्रमासाठी नागरिक माय गोव्ह, नमो अप्लिकेशन किंवा  १८००११७८०० क्रमांकाच्या माध्यमातून सूचना, अभिनव कल्पना आणि नव-नवीन उपक्रमांबद्दल माहिती पाठवू शकतात.मन की बात चे थेट प्रसारण नमो आप्लिकेशन, दूरदर्शन, प्रसार भारती आणि आकाशवाणीच्या सर्व प्रदेशिक केंद्रांद्वारे, तसेच केंद्र सरकारच्या विविध सामाजिक माध्यमांद्वारे केले जाते. मुख्य भागाच्या प्रसारणानंतर हिंदी शिवाय इतर भारतीय भाषांमध्येही मन की बात चे प्रसारण आयोजित केले जाते.

Recent Posts

Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…

23 mins ago

३६५ दिवस चालणार Jioचा हा नवा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री मिळणार FanCode

मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…

2 hours ago

सेकंड हँड मोबाईल खरेदी करताय तर घ्या ही काळजी, नाहीतर होईल मोठे नुकसान

मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…

2 hours ago

चालत्या बसमध्ये लागली आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग…

3 hours ago

मुंबईकरांच्या विकासाला कौल देणारी निवडणूक

सोमवारी २० मे रोजी मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. सहा लोकसभा मतदारसंघांसाठी…

8 hours ago

होर्डिंग काळ बनून येतो तेव्हा…

विवेक वेलणकर: सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्धीचे एक माध्यम म्हणून अवाढव्य होर्डिंग उभे करण्याचा पायंडा पडला आणि…

9 hours ago