अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन ‘पून्हा’ घसरून पडले!

Share

कोलोरॅडो : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर घसरुन पडले. कोलोरॅडोमध्ये यूएस एअर फोर्सच्या पदवीदान समारंभात ही घटना घडली. यापूर्वीही ते पाचवेळा खाली कोसळले होते.

कोलोरॅडोमध्ये यूएस एअर फोर्सच्या पदवीदान समारंभात अखेरची पदवी दिल्यानंतर बायडेन आपल्या जागेकडे जात होते. यावेळी जाताना त्यांचा पाय वाळूच्या पिशवीवर पडला अन् ते घसरले.

व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष बायडेन ठीक आहेत. व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन डायरेक्टर बेन लाबोल्ट यांनी ट्विट केले आहे की, अध्यक्ष ठीक आहेत आणि त्यांना दुखापत झालेली नाही.

या कार्यक्रमाच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बायडेन उभे राहताच त्यांनी बोटाने स्टेजकडे इशारा केला. तेथे काळ्या रंगाची वाळूने भरलेली पिशवी होती. यामध्ये बायडेन यांचा पाय अडकल्यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले.

बायडेन हे अमेरिकेत अध्यक्षपद भूषवणारे सर्वात वयस्कर नेते आहेत. ८० वर्षीय डेमोक्रॅट नेत्याने २० जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून त्यांनी अमेरिकेची सत्ता मिळवली होती. २०२४ मध्ये ते पुन्हा निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान, बायडेन यांना दुखापत झाली नसली तरी, या घटनेचा व्हिडिओ मात्र व्हायरल झाला आहे.

Tags: joe biden

Recent Posts

PBKS vs RR: सॅम करनच्या खेळीने पंजाबला तारलं, ५ गडी राखुन राजस्थानला मारलं…

PBKS vs RR: राजस्थान आणि पंजाब किंग्सच्या सामन्यात संजु सॅमसनने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला.…

2 hours ago

Indian Railway : रेल्वेची फेरीवाल्यांवर करडी नजर; खाद्यपदार्थ तसेच पाण्याच्या बाटल्यांना मज्जाव

फेरीवाल्यांवर कारवाई करत तब्बल 'इतका' दंड केला वसूल पुणे : रेल्वे गाड्या आणि स्थानकांमध्ये अनधिकृत…

2 hours ago

UGC : धक्कादायक! यूजीसीच्या अँटी-रॅगिंग हेल्पलाइनवर लैंगिक, शारिरीक शोषणाच्या गंभीर तक्रारी

दररोज सरासरी ३०० कॉल्स सामान्य, ३-४ रॅगिंगच्या तक्रारी पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाची अँटी-रॅगिंग हेल्पलाइन…

3 hours ago

Eknath Shinde : जोवर चंद्र सूर्य आहेत तोवर मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली दक्षिण मध्य मुंबईत गर्जना मुंबई : 'निवडणूक आली की काहीजण मुंबई…

4 hours ago

Alamgir Alam : काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना अटक!

सचिवाच्या नोकराकडे ३७ कोटींची रोकड सापडल्याप्रकरणी ईडीची कारवाई रांची : निवडणुकीच्या काळात सुरु असलेला पैशांचा…

4 hours ago

Chandrashekhar Bawankule : राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे महायुतीला मिळाले बळ

बावनकुळेंनी दिले शिवतीर्थवर जात पंतप्रधानांच्या सभेचे निमत्रंण मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) अखेरच्या…

5 hours ago