Cyber crime : पार्टटाइम जॉबचे आमिष सायबर भामट्याच्या शोधात पोलीस

Share
  • गोलमाल : महेश पांचाळ

आपल्याला पार्टटाइम जॉबमध्ये स्वारस्य आहे का? असे विचारणारा व्हॉट्सॲप कॉल हा दक्षिण मुंबईतील एका फूड स्टॉलच्या मालकाला आला होता. स्टॉलवर काम करताना मोबाइलवरून जर पार्टटाइम धंदा करण्याची संधी मिळत असेल तर काय वाईट आहे, असा विचार या मालकाच्या मनात आला. प्रयत्न करायला हरकत नाही, असे समजून त्याला पाठवण्यात आलेल्या एक लिंकवर काम करायचे, असे फूड स्टॉल मालकाने ठरविले. त्या लिंकमध्ये अनेक हॉटेल्सची माहिती होती आणि त्याला रेटिंग देण्यास सांगण्यात आले होते. रेटिंग दिल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन त्याच व्हॉट्सॲप नंबरवर परत पाठवण्यास सांगण्यात आले होते. “स्टॉल मालकाने सूचनांचे तंतोतंत पालन केले आणि हॉटेलला रेटिंग दिल्यावर आणि त्याच नंबरवर त्याचा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर सुरुवातीला त्याला १५० रुपये मिळाले. त्यानंतर तो इतर हॉटेलांना रेटिंग देत होता. त्या बदल्यात त्याला दीडशे रुपयांपासून दोन हजार ८०० रुपये मिळाले. स्टॉल मालकाला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडण्यात आले होते. या ठिकाणी संशयित अनोळख्या व्यक्तींकडून त्याला प्री-पेड कामांमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले आणि प्रतिदिन तीन हजार रुपये ते चार हजार रुपये नफा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले होते. स्टॉल मालकाने अवघ्या पाच दिवसांत टेलिग्रामवर सांगितलेल्या चार वेगवेगळ्या बँक खाते क्रमांकावर ११ लाख रुपये ट्रान्सफर केले. एवढी मोठी रक्कम गुंतवणूक करूनही पुढील दोन-तीन दिवसांत नफा मिळू शकला नाही, तेव्हा स्टॉल मालकाला संशय आला. त्याने चौकशी करण्यास सुरूवात केली. पैसे परत मिळविण्यासाठी त्याला आणखी पैसे गुंतवण्यास सांगितले होते; परंतु कोणतेही समाधानकारक उत्तर किंवा पैसे मिळाले नाहीत म्हणून त्याचा संशय अधिक बळावला आणि त्याने पोलिसांकडे धाव घेतली. रितसर तक्रार नोंदविण्यात आली. सहपोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक देवराज बोरसे यांच्या नेतृत्वाखालील एक पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. जास्त नफ्याचे आमिष दाखवून ११ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या त्या सायबर फसवणूक करणाऱ्या भामट्याचा पोलीस शोध घेत आहेत.

सध्या ऑनलाइनचा जमाना आहे; परंतु काळजी घेतली नाही, तर मोठा फटका बसू शकतो, हे विसरून चालणार नाही. सायबर भामटे विविध माध्यमांतून फसवणूक करण्याचे काम करत आहेत. यासंदर्भात गुन्हे वाढत असताना अटक झालेल्यांची संख्या मात्र नगण्य आहे. कधी ‘वर्क फ्रॉम होम’ देत असल्याचे आमिष देत फसवणूक होते केव्हा पार्टटाइम जॉबच्या नावावर फसवले जाते. मुंबईत नव्हे, तर महाराष्ट्रात असे अनेक गुन्हे घडत आहे. त्यामुळे आमिषाला बळी न पडता सायबर ठगांपासून जनतेने सावध असायला हवे.

maheshom108@ gmail.com

Tags: cyber crime

Recent Posts

Jioने आणला नवा प्लान, मिळणार डेटा, कॉलिंग आणि १५हून अधिक OTT

मुंबई: जिओने एक नवा प्लान सादर केला आहे. हा Ultimate streaming plans आहे. हा पोस्टपेड…

24 mins ago

Loksabha Election : पैसे द्या,मग मत देतो ; आंध्र प्रदेशात मतदारांची अजब मागणी

नवी दिल्ली : सध्या देशभरात चौथ्या टप्प्याचे मतदान उत्साह पाहायला मिळाले. परंतु, आंध्र प्रदेशमधील पलानाडूच्या…

43 mins ago

Health Tips : मुंबईकरांनो सावधान! अवकाळी पावसामुळे वाढला संसर्गाचा धोका

'अशी' घ्या आरोग्याची काळजी मुंबई : मे महिन्यातील उन्हाळ्याचे दिवस चालू असताना मुंबईत अचानक अवकाळी…

1 hour ago

Mumbai Rain : मुंबईतील अवकाळी पावसाचं रौद्र रुप; पेट्रोल पंपावर कोसळले होर्डिंग

होर्डिंग खाली अनेकजण दबल्याची शक्यता मुंबई : मुंबईसह परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील…

2 hours ago

Loksabha Election 2024 : मतदानाचा चौथा टप्पा पार पडला; देशात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५२.६०% मतदान!

राज्यात कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात (Loksabha Election 2024) आज…

2 hours ago

Mumbai airport runway : वादळी वाऱ्यामुळे मुंबई विमानतळ रनवे बंद!

अनेक फ्लाईट्स दुसरीकडे वळवल्या मुंबई : दुपारी कडकडीत ऊन पडलेले असताना अगदी तासाभरात मुंबईचे चित्र…

3 hours ago