काय गं कुसुम, मुंबईला कशी, काय चाललंय?.पवारांनी सांगितला आठवणीतला किस्सा

Share

मुंबई : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा उद्या १२ डिसेंबरला ८१ वा वाढदिवस साजरा होत आहे. राज्यभरात पवार यांच्या वाढदिवसाचे सोहळे सुरू झालेले आहेत. या निमित्त मुंबईत आज लेखक, पत्रकार सुधीर भोंगळे यांनी लिहिलेल्या ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शरद पवार यांच्या गाजलेल्या भाषणांचा संग्रह या पुस्तकात करण्यात आला आहे. यावेळी पवार यांची कार्यकर्त्यांची नावे लक्षात ठेवण्याच्या खुबीवर चर्चा झाली. यावेळी पवार यांनी एक किल्ला सांगितला. तो सर्वांच्या कायम स्मरणात राहील असा आहे.

राजकारणात फार कमी कष्टाने आणि कमी भांडवलात तुम्हाला यश मिळते. फक्त तुम्ही समोरच्या माणसाचे नाव लक्षात ठेवले पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना एक महिला मला भेटायला आली. ती माझ्या मतदारसंघातलीच होती. तिचे काहीतरी काम होते. मी तिला म्हटले, की काय गं कुसुम, मुंबईला कशी, काय चाललंय?. यावर साहेबांनी मला नाव घेऊन हाक मारली. काम होवो न होवो, अशी तिची भावना होती, असा किस्साच शरद पवार यांनी उपस्थितांना ऐकवला.

 

 

Tags: Sharad Pawar

Recent Posts

Lok Sabha Elections 2024: निवडणूक आयोगाची कारवाई, आतापर्यंत जप्त केले तब्बल ८८८९ कोटी

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) पाचव्या टप्प्याचे मतदान २० तारखेला होणार आहे. यातच…

2 hours ago

काशी-मथुरेत मंदिर उभारण्याची कोणतीही योजना नाही : जे.पी. नड्डा

काशी व मथुरेमध्ये मंदिर बांधण्यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा…

3 hours ago

उन्हाळ्यात आल्याचे सेवन करताय का? तर हे जरूर वाचा

मुंबई: उन्हाळ्यात प्रमाणापेक्षा आल्याचा वापर शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला विस्ताराने सांगणार आहोत…

3 hours ago

Eknath Shinde : हिंदूत्व सोडले आता भगव्या झेंड्याची अ‍ॅलर्जी कारण तुमच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर जोरदार टिका यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा मुंबई…

3 hours ago

मोदी यांच्या काळातील विकासकामे प्रत्येक घराघरात पोहोचवा : फडणवीस

उपमुख्यमंत्र्यांची उत्तर मुंबई लोकसभेसाठी आढावा बैठक मुंबई : उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस…

4 hours ago

Heatwave in India : देशभरात उष्णतेची लाट; तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचणार! तर काही भागात मुसळधार!

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…

5 hours ago