ओंकार स्वरूपा…

Share

रसिका मेंगळे

उत्साहात उत्साह साजरा करणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सव हा प्रार्थना, भक्तिभाव, मांगल्याचा सण आहे. तसाच तो स्वर, नाद, सूर, ताल यांचाही सण. मंगलमूर्तीच्या आरत्या दरम्यान किणकिणणाऱ्या टाळ्यांचा गजर, ढोलकीचा ताल किंवा मिरवणुकीदरम्यान अवघे वातावरण भारून टाकणारा ढोल ताशांचा गजर याशिवाय गणेशोत्सव पूर्ण होणे कठीणच. मुंबईसह महाराष्ट्रभर गणरायाच्या आगमनाची तयारी जोरात करण्यात आली आहेत. मुंबईतील मूर्तिकारांच्या गणेशमूर्तींना देशभरातून मागणी असते. यंदाही अनेक गणेशमूर्ती राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीकडे रवाना झाल्या आहेत. आपल्या लाडक्या गणरायाला वाजत-गाजत आणण्यासाठी भक्त मंडळी सज्ज झाली आहेत. काही घरी गणरायाला आदल्या दिवशी आणले जाते.

महाराष्ट्राचा आराध्यदैवत गणपती आज अनेकांच्या घराघरांत तसेच सार्वजनिक मंडळात विराजमान होत आहेत. श्रावण महिना सुरू होताच सर्वांना गणरायाच्या आगमनाचे वेध लागतात. गणेशोत्सवाचा काळ हा पूर्णपणे या दिवसांत भारलेला असतो. दिवाळीसारखाच उत्साह सगळीकडे पाहायला मिळतो. सगळीकडे बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह संचारलेला असतो. विविध आकाराची आणि आकर्षक रंगसंगतीची मखरे, तोरणे, विद्युत रोषणाईच्या माळा, फुलमाळा, गणपतीचे आभूषणे, अलंकारिक वस्त्राप्रावरणे इ. साहित्याने सजलेल्या बाजारपेठा बघण्यास मिळतात. अनेक गणेशभक्त सहकुटुंब-सहपरिवार खरेदीचा आनंद लुटतात. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, मशीद बंदर, लालबाग परळ, दादर यासह ठिकठिकाणीच्या बाजारपेठा फुललेल्या आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे लोकांमध्ये एकात्मता व समाजसेवेची भावना जागृत व्हावी यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. तसेच महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारकांनी सामाजिक एकतेची भावना लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्नही केलेले होते. आजपर्यंत ही परंपरा महाराष्ट्रात अखंडपणे चालू आहे. मुंबईतील गणेशोत्सव हा बघण्याजोगा असतो. त्यातच लालबागचा राजा चिंतामणी, परळमध्ये मुंबईचा राजा गणेशगल्ली, काळाचौकीचा महागणपती असे सगळ्या गणेश मंडळामध्ये दरवर्षी भल्या-मोठ्या मूर्त्या गणरायाच्या विराजमान होतात. देखावे देखील मोठे साकारले जातात.

कला आणि विद्यांचा अधिष्ठाता असलेला गणेश एक उत्तम नर्तकही आहे बरं का! आपलं लंबोदर सांभाळून तो स्वतःच्या नृत्यकलेतील प्रावीण्य जोपासतो आहे. ब्रह्मपुराणातील आख्यायिकेनुसार गणेशाने शंकर आणि पार्वती यांच्यासमोर नृत्य करून त्यांना प्रसन्न केले. त्यामुळे शंकराने त्याला कौतुकाने स्वतःच्या डोक्यावरील चंद्र बहाल केला. अत्यंत नटून थाटून चपळाईने तरीही लालित्यपूर्ण नृत्य करणारा गणेश हा सर्व कलाकारांचा आदर्शच आहे. सर्वांना आपल्या कौशल्याने मोहीत करून कलेची निष्ठेने आराधना करण्याचा गुण शिकविणारा हा नृत्यगणेश सर्व कलासक्त मनांना प्रेरणा देत असतो. गणपतीचे आगमन दरवर्षीच एक नवचैतन्य घेऊन येतो. हे दहा दिवस आनंद, मांगल्य, पावित्र्य, सद्भभाव आदींनी भारलेले असतात. तसं पाहायला गेलं तरी गणपती आले म्हणून नेहमीची व्यावधानं सुटत नसतात. नोकरी-धंद्याचा व्याप-ताप, अनेकांचे उपद्रवमूल्य, क्षणोक्षणी साथ करणाऱ्या चिंता, व्यग्रता, व्यस्तता या सर्वांसह आपण गणेशाला सामोरे जातो. या दहा दिवसांत ना देशातलं वातावरण बदलते, ना जगात बदल होतो. बदल होतो तो आपल्या अंतःकरणात, आपल्या मनात आणि आपल्या भावनेत होतो.

आज १९ सप्टेंबर गणेश चतुर्थी. गणरायाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. त्यातही उकडीचे मोदक खास. मोदकाचेही खूप प्रकार आपल्याला या दिवसांत खायला मिळतात, पाहायला मिळतात. पण गणपतीला नैवेद्य म्हणून परंपरेप्रमाणे उकडीचे मोदकच दाखवतात. मोदक करण्याचा सोहळा हा तर घरोघरी रंगत असतो. त्याचबरोबर इकोफ्रेंडली गणपतीची आरास करून आपण पर्यावरणाला पूरक अशी गणपतीची आरास सजावट करूया. काही घरी दीड दिवसाचे गणपती, काही घरी गौरी-गणपती, तर काही घरी दहा दिवसांच्या गणपतीचे आगमन असतात. या दिवसांत घरातले सगळेजण एकत्र जमलेले असतात. ख्यालीखुशाली सांगत, गप्पा मारत हा सोहळा यथेच्छ रंगतो… नाती पुन्हा एकदा गुंफली जातात… गणपतीच्या साक्षीनं… आणि कोकणात तर दिवाळीपेक्षाही गणेशोत्सवाला अतिशय महत्त्व असतं.

वाचकहो, या आजच्या दिवशी गणरायाला नमन करून जगातील दुःख, दारिद्र्य नाहीसे होऊ दे, सर्वांना सुखात, आनंदात नांदू दे, निरोगी राहू दे, अशी प्रार्थना करूया आणि गणपती बाप्पा मोरया म्हणूया.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

IPL 2024 Final: चेन्नईमध्ये होणार फायनल, तिकीटांची विक्री सुरू, कितीचे आहे स्वस्त तिकीट

मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…

26 mins ago

Health: दररोज आवळ्याचे सेवन करण्याचे हे आहेत चमत्कारी फायदे

मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…

2 hours ago

राज्यात शांततेत मतदान पार; आता उत्सुकता निकालाची

मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…

2 hours ago

IPL 2024: चेन्नई बाहेर जाण्याचे दु:ख पचवू शकला नाही अंबाती, कमेंट्री बॉक्समध्ये आले रडू

मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…

3 hours ago

मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…

4 hours ago

Sushant Divgikar : सुशांत दिवगीकरच्या घरात लागली आग; अ‍ॅवॉर्ड्ससह काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक!

कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…

6 hours ago