Tuesday, June 18, 2024
Homeक्रीडाOMAN vs ENG: इंग्लंडचा कहर, फक्त १९ बॉलमध्ये ओमानचा केला पराभव

OMAN vs ENG: इंग्लंडचा कहर, फक्त १९ बॉलमध्ये ओमानचा केला पराभव

मुंबई: इंग्लंडने अँटीग्वामध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात ओमानचा लाजिरवाणा पराभव केला. त्यांनी हा सामना ८ विकेटनी जिंकला. इंग्लंडने या विजयासह टी-२० वर्ल्डकप २०२४मधील सुपर ८च्या आशा कायम ठेवल्या आहे.

इंग्लंडने ओमानविरुद्ध रेकॉर्डतोड कामगिरी केली. ओमानने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ४७ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने हे आव्हान १९ बॉलमध्येच पूर्ण केले.

टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या ओमानचा संघ ४७ धावांवर ढेपाळला. त्यांचा एक खेळाडू सोडला तर इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. शोएब खानने २३ चेंडूंचा सामना करताना ११ धावा केल्या. कर्णधार आकिब केवळ ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. खालिद १ धावेवर बाद झाला. या दरम्यान इंग्लंडसाठी आदिल रशीदनने घातक गोलंदाजी केली. त्याने ४ विकेट मिळवले. रशीदनने ४ षटकांत केवळ ११ धावा केल्या. तर जोफ्रा आर्चर आणि मार्क वूडने प्रत्येकी ३ विकेट मिळवल्या.

केवळ ३.१ षटकांत मिळवले लक्ष्य

ओमानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने केवळ ३.१ षटकांत विजय मिळवला. दरम्यान, त्यांचे २ विकेटही पडले. इंग्लंडसाठी फिलिप सॉल्ट आणि जोस बटलर सलामीसाठी आले. या दरम्यान, सॉल्ट ३ बॉलमध्ये १२ धावा करून बाद झाला. बटलर शेवटपर्यंत टिकला. त्याने नाबाद २४ धावा ठोकल्या. विल जॅक्स ५ धावा करून बाद झाला. तर जॉनी बेअरस्ट्रॉ धावांवर नाबाद राहिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -