महिलांनो खासगी बसमध्येही ५० टक्के सवलतीनं फिरा, कसे? घ्या जाणून

Share

गडचिरोली : गुढीपाडव्यानिमित्त महिलांना आणखी एक गुडन्यूज मिळाली आहे. आता खासगी बसमध्येही महिलांना पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये पन्नास टक्के सवलत मिळाल्यानंतर बसमध्ये महिला प्रवाशांची संख्या वाढली होती. त्याचा फटका खासगी प्रवास वाहतूकदारांना बसत होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानंतर गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिएशनची एक बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत अधिक माहिती देताना, गडचिरोली ते चंद्रपूर मार्गावर खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत देण्याचे जाहीर करण्यात आले असल्याचे असोसिएशनचे अविनाश वरगंटीवार यांनी सांगितले.

दरम्यान, दिलेल्या ५० टक्के सवलतीनंतर आता एसटी महामंडळाने बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी काही नियम तयार केले आहेत. मात्र खासगी ट्रॅव्हल्सकडे सध्या तरी अशा प्रकारचे कोणतेही नियम नाहीत. अशा प्रकारचा निर्णय राज्यातील अन्य ट्रॅव्हल्सही घेऊ शकतात. असे घडले तर एसटी महामंडळाप्रमाणेच खासगी ट्रॅव्हल्सचाही निर्णय संपूर्ण राज्यासाठी असेल.

Recent Posts

Hindu temples : मुंबईतील प्राचीन मंदिर बाबुलनाथ

कोकणी बाणा : सतीश पाटणकर मुंबई शहरात अनेक पर्यटन स्थळे, प्राचीन, प्रसिद्ध मंदिरांचा वारसा लाभला…

2 hours ago

प्रेमकहाणी भाग-१

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड प्रेमकहाणी या लेखामधून दोन प्रेमी जीवांची झालेली ताटातूट, तरी…

2 hours ago

Drought : डोळे उघड माणसा…

विशेष : लता गुठे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे…

2 hours ago

Mahabharat : महाभारत युद्धातील जेवण व्यवस्थेचे रहस्य

विशेष : भालचंद्र ठोंबरे महाभारतात कौरव पांडवांचे युद्ध होणार, हे निश्चित झाल्यावर, देशोदेशीच्या राजांनाही या…

2 hours ago

साठवण…

विशेष : नीता कुलकर्णी गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची... आमच्या परीक्षा झाल्या की, आई वर्षभराच्या…

3 hours ago

Nostalgic song : हसता हुवा नुरानी चेहरा…

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे बाबुभाई मिस्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘पारसमणी’(१९६३) ही एक छोटी संगीत मेजवानी…

3 hours ago