Tuesday, June 18, 2024
Homeताज्या घडामोडीNIA : ६ राज्ये, ५१ ठिकाणांवर एनआयएचा छापा, खालिस्तानी-गँगस्टरवर मोठी कारवाई

NIA : ६ राज्ये, ५१ ठिकाणांवर एनआयएचा छापा, खालिस्तानी-गँगस्टरवर मोठी कारवाई

नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास विभागाने(national investigation agency)  गँगस्टर आणि खालिस्तानी संघटनेविरोधात मोठी कारवाई केली आहे. तपास विभागाने पंजाब, हरयाणा, राजस्थान, दिल्ली एनसीआर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील साधारण ५१ ठिकाणांवर एनआयएने छापेमारी केली. एनआयएकडून दहशतवादी, गँगस्टर आणि ड्र्रग्स डीलर्स यांच्यातील संबंधित ३ केसमध्ये ही कारवाई करण्यात आली.

सर्वाधिक पंजाबमध्ये ३० ठिकाणी एनआयएच्या टीमने छापा टाकला. तर राजस्थानात १३, हरयाणामध्ये ४ आणि उत्तराखंडमध्ये २, दिल्ली एनसीआर आणि यूपीमध्ये प्रत्येकी एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

तीन गँग एनआयएच्या निशाण्यावर

एनआयएने ज्या ५१ ठिकाणी छापेमारी केली ते लॉरेन्स बिश्नोई, बंबिहा गँग आणि अर्श डल्ला गिरोहच्या सदस्यांशी संबंधित आहे. दिल्लीमध्ये भीमा थाना रोडीमध्ये एनआयएची टीम पोहोचली. येथे यादविंदर उर्फ जशनप्रीतच्या घरावर छापा टाकण्यात आला. यदविंदरच्या खात्यामध्ये परदेशातून फंडिंग झाले आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये देश तसेच परदेशात खालिस्तानी कारवाईला वेग आल्याचे दिसून येत आहे. पंजाब तसेच हरयाणामध्ये खालिस्तानी दहशतवादी अॅक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे खालिस्तानी दहशतवादी बऱ्याच कारवायांसाठी गँगस्टर्सची मदत घेत होती अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेच्या हाती लागली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -