मेगा अगरबत्ती ६ फुट उंचीची असून ५ इंच गोलाकार आहे आणि सतत २४ तास अखंडपणे पेटत राहून वातावरण प्रसन्न, सुगंधित व सकारात्मक करते.
मुंबई- गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख उत्सव आणि गणपतीला आराध्यदैवत मानले जाते, म्हणूनच गणेश चतुर्थीचे औचित्य साधून भारतातील नामांकित, इंदूर स्थित म्हैसूरदीप पफ्र्युमरी हाऊस अगरबत्ती कंपनीने आपली झेड ब्लॅक मेगा अगरबत्ती मुंबई इथल्या सिद्धीविनायक मंदिर आणि फोर्टचा इच्छापूर्ती गणपती येथे पहिल्यांदा प्रज्वलित केली. त्याचबरोबर ५००० अगरबत्ती भेट म्हणून गणेशभक्तांना देण्यात आली. भक्तगणांसाठी झेड ब्लॅक मेगा अगरबत्ती विशेष औचित्यपूर्ण व आकर्षक ठरेल, कारण मेगा अगरबत्ती ६ फुट उंचीची असून ५ इंच गोलाकार आहे आणि सतत २४ तास अखंडपणे पेटत राहून वातावरण प्रसन्न, सुगंधित व सकारात्मक करते. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रीउत्सव सुद्धा फार थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीच्या ९ दिवसात प्रत्येक भक्त आपल्या देवीपूजेसाठी काही न् काही वेगळे करत असते. या वर्षीच्या दुर्गापूजा सुगंधित व प्रसन्न राहील कारण झेड ब्लॅक मेगा अगरबत्ती विविध-विविध मंडळात पाहायला मिळणार आहे, असे एम डी पी एचचे संचालक अंकित अगरवाल यांनी सांगितले.
[EPSB]
[/EPSB]