उत्तरप्रदेशातल्या पान-गुटखा खाणा-या सरकारी बाबूंना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चांगलेच फटकारले आहे.
लखनऊ- उत्तरप्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी बुधवारी सर्व विभागातील कार्यालयीन कर्मचा-यांसाठी तातडीने आदेश जारी केले आहेत. त्यांनी सर्व सरकारी कार्यालयात पान, गुटखा खाणा-यांवर बंदी घातली आहे.
योगी आदित्यनाथ बुधवारी सकाळी सचिवालयात गेले असता कार्यालयाच्या भिंती पान, गुटख्याने रंगलेल्या आढळल्या. त्यामुळे त्यांनी तात्काळ सर्व सरकारी कार्यालय, रुग्णालय, कॉलेज आणि शाळांमध्ये पान, तंबाखू व गुटखा खाण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले.