चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांना जागतिक महिला दिनाच्या दिवशीच ट्विटरवर वादग्रस्त ट्विट केले.
मुंबई- चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांना जागतिक महिला दिनाच्या दिवशीच ट्विटरवर वादग्रस्त ट्विट केले. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांच्यावर नाराज झाले आहेत.
‘सनी लिओनीप्रमाणे सर्व महिलांनी पुरुषांना समाधान द्यावे अशी मी जगातल्या तमाम महिलांसाठी शुभेच्छा देतो, असे ट्विट त्यांनी केले. या टि्वटवर त्यांचे चाहते प्रचंड संतप्त झाले असून खूपच तिखट प्रतिक्रीया राम गोपाल वर्मा यांना मिळत आहेत.
राम गोपाल वर्मा यांनी महिला दिनाच्या निमित्ताने यापुर्वीही काही ट्विट्स केले आहेत. यामध्ये त्यांनी ‘महिला दिन’ हा खरे तर ‘पुरुष दिन’ म्हणून ओळखला जायला हवा कारण पुरुषच तो अधिक साजरा करतात. वर्षातला एक दिवस ‘पुरुष आणि महिलांचा दिवस’ म्हणून साजरा करायला हवा असे टि्वटही केले आहे.
I wish all the women in the world give men as much happiness as Sunny Leone gives
— Ram Gopal Varma (@RGVzoomin)
Women's day should be called #MensDay because men celebrate women much more than women celebrate women
— Ram Gopal Varma (@RGVzoomin)