कुलभूषण जाधव यांच्या आईने व्हिसासाठी केलेल्या अर्जाची दखल न घेतल्यामुळे केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अझीझ यांना खडे बोल सुनावले.
नवी दिल्ली- पाकिस्तानी नागरिकांना भारत सरकार मेडिकल व्हिसा नाकारत असल्याचा कांगावा करणा-या पाकिस्तानचा खोटारडेपणा केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी उघड केला आहे. तसेच कुलभूषण जाधव यांच्या आईला व्हिसा देण्याच्या अर्जाची दखल घेतली नसल्याने खडे बोल सुनावले.
कुलभूषण जाधव भारतीय नागरिक असून हेरगिरी, विघातक कारवाया आणि दहशतवादी कृत्ये केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुलाच्या भेटीसाठी जाधव यांच्या आई अवंतिका जाधव यांनी व्हिसासाठी अर्ज केला. मात्र त्याची दखलही घेतली नाही. त्यामुळे सुषमा स्वराज यांनी अझीझ यांना धारेवर धरले.
‘आपल्या मुलाला भेटण्यासाठी अवंतिक जाधव यांनी केलेला अर्ज अद्याप प्रलंबित आहे’, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले. एवढेच नाही तर जाधव यांच्या आईला व्हिसा मिळवून देण्यासाठी मी स्वतः पत्र लिहिले, मात्र पत्र मिळाल्याची पोच देण्याचा शिष्टाचारही त्यांनी पाळला नाही’, असे त्या म्हणाल्या.
तसेच पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी गेल्या आठवड्यात भारतीय दूतावास कॅन्सर पीडित महिलेला व्हिसा नाकारत असल्याचे वृत्त दिले होते. याविषयी बोलतांना सुषमा स्वराज म्हणाल्या की, पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा मिळत नसल्याच्या मागे सरताज अझीझ कारणीभूत आहेत. पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा देण्यामध्ये भारताला कोणतीही समस्या नाही, मात्र यासाठी अझीझ यांनी देशाच्या नागरिकांसाठी मध्यस्थी करण्याची गरज असल्याचे सांगितले.
कॅन्सर पीडित तरुणी फैजा तनवीर हिला उपचारांसाठी भारतात यायचंय. त्यासाठी तिनं सुषमा स्वराज यांना विनंतीही केली आहे. त्यावरूनच, पाकिस्तानी माध्यमांनी भारताच्या बदनामीचं कारस्थान रचलं होतं. भारताकडून पाकमधील रुग्णांना मेडिकल व्हिसाही दिला जात नसल्याची ओरड सुरू झाली होती. त्यांना स्वराज यांनी चांगलेच उत्तर दिले.
I have my sympathies for all Pakistan nationals seeking medical visa for their treatment in India. /1
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj)
I am sure Mr.Sartaj Aziz also has consideration for the nationals of his country. /2
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj)
All that we require is his recommendation for the grant of medical visa to Pakistan nationals. /3
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj)
I see no reason why should he hesitate to give his recommendation for nationals of his own country. /4
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj)
We also have a visa application pending for an Indian national Mrs.Avantika Jadhav who wants to meet her son in Pakistan /5
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj)
against whom they have pronounced a death sentence. /6
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj)
I wrote a personal letter to Mr.Sartaj Aziz for the grant of her visa to Pakistan. /7
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj)