मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या मतदानादरम्यान अनेक ठिकाणी मतदान यंत्राणांत बिघड आढळून आल्याने सकाळी गोंधळाची परिस्थिती होती.
मुंबई- मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या मतदानादरम्यान अनेक ठिकाणी मतदान यंत्राणांत बिघड आढळून आल्याने सकाळी गोंधळाची परिस्थिती होती. मात्र निवडणूक आयोगाने दक्षता घेत हा गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांसाठी राज्यभरात मतदानाला सकाळी उत्साहात सुरुवात झाली, मात्र यंत्रामध्ये बिघाड असल्याने काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. भायखळा पूर्वेकडील महापालिका शाळेत मतदानादरम्यान अडचणी येत होत्या.
मतदारांच्या स्लीपवर वर्गाचे खोली क्रमांक लिहिण्यात आले होते. मतदान केंद्र क्रमांक छोटया अक्षरात लिहिण्यात आल्याने मतदारांचा गोंधळ उडाला होता. काही जण खोली क्रमांकाप्रमाणे बुथ शोधत होते. या सर्व गोंधळामुळे काही केंद्रांवर तोबा गर्दी तर काही ठिकाणी शुकशुकाट पसरला होता. तर बुथ क्रमांक ११ येथील मशीन बंद पडल्याने तेथील मतदानही थांबले होते. हा गोंधळ पाहून सर्व पक्षीय उमेदवारांनी केंद्रावर धाव घेतली.
नाशिकमध्ये एका मतदान केंद्रावर तांत्रिक अडचणीमुळे मतदान बंद पडले होते. त्यानंतर अधिका-यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर तेथील मतदान सुरळीत पार पडले.