वाळपाईतून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन आमदारकीची शपाथ घेतल्याच्या दोन तासांतच राजीनामा दिलेले विश्वजित राणे हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
पाणजी- गोव्यात भाजपाच्या आमदारांची संख्या आणखीन एकाने वाढणार आहे. वाळपाईतून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन आमदारकीची शपाथ घेतल्याच्या दोन तासांतच राजीनामा दिलेले विश्वजित राणे हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
सध्या गोव्यात भाजपाचे १३ आमदार आहेत. गोवा फॉरवर्डच्या तीन, मगोच्या तीन आणि इतर तीन अपाक्षांच्या पाठिंब्याने भाजपाने सरकार स्थापान केले आहे. भाजपाने तडजोडीचे राजकारण फार काळ करावे लागू नये म्हणून आपाल्या आमदारांची संख्या वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार राणे यांचा पाक्षप्रवेश होणार आहे.
याविषयी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांना विचारले असता ते म्हणाले, राणे भाजपामध्ये निश्चितपाणे येतील. मात्र ते कधी येतील ते आताच सांगता येणार नाही. त्यांचा पाक्षप्रवेश ठरला की निश्चितपाणे सांगू.
गोव्याच्या राज्यसभा सदस्याची मुदत येत्या जुलैमध्ये संपाते. सध्या कॉंग्रेसचे शांताराम नाईक हे राज्यसभा सदस्य आहेत. त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापासिंह राणे यांना राज्यसभेवर पाठविण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरु आहे.
ते भाजपामध्ये आल्यास त्यांना केंद्रात मंत्रिपाद देण्याचीही भाजपाने तयारी केल्याची माहिती मिळाली आहे. ते सध्या पार्येचे आमदार आहेत. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पार्येतून विश्वजित यांची पात्नी डॉ. दिव्या राणे भाजपाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे भाजपा आमदारांची संख्या १५ वर पोहोचू शकते.