विराट कोहली हा क्रिकेट विश्वातील डोनाल्ड ट्रम्प असल्याचे ऑस्ट्रेलिया माध्यमांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली- भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेसह त्यांच्यातील वादही वाढतच चालले आहे. विराट कोहली हा क्रिकेट विश्वातील डोनाल्ड ट्रम्प असल्याचे ऑस्ट्रेलिया माध्यमांनी म्हटले आहे.
‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे विराट कोहलीही प्रत्येक गोष्टीसाठी मीडियाला दोषी ठरवत असल्याचे ऑस्ट्रेलिया माध्यामांनी म्हटले आहे.
स्मिथ पुन्हा नडला
पुणे, बेंगळुरू आणि रांची अशा तिन्ही कसोटीत कोहलीला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. याचे खापर कोहलीने प्रसारमाध्यमांवर फोडले आहे. कोहली जागतिक क्रीडा क्षेत्रातील ट्रम्पच झाला आहे’, असे ऑस्ट्रेलियाची न्यूज वेबसाईट ‘द डेली टेलिग्राफ’ने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंविषयी चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप विराटवर करण्यात आला आहे. त्यामुळे विराट कोहली वि. ऑस्ट्रेलिया संघ असे चित्र पहायला मिळत आहे.
कोहली-स्मिथ ‘डीआरएस’ वादात बोर्डांची उडी
याअगोदर बंगळूरमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी दरम्यान डीआरएस घेण्यावरून विराट आणि स्मिथ यांच्यात वाद झाला होता.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. तिस-या सामन्यानंतर दोन्ही संघ १-१ बरोबरीवर आहेत. धर्मशाला येथे होणा-या चौथ्या कसोटी सामन्यानंतर मालिकेचा निकाल लागणार आहे.