सणांच्या मोसमाला सुरुवात होताच कान्ज्युमार ड्युरेबल सेगमेंटमधील स्वदेशी कंपनी व्हिडीओकॉन आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवीन तंत्रज्ञान असलेली उत्पादने लाँच करण्यासाठी पूर्णत: सज्ज झाली आहे.
मुंबई – सणांच्या मोसमाला सुरुवात होताच कान्ज्युमार ड्युरेबल सेगमेंटमधील स्वदेशी कंपनी व्हिडीओकॉन आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवीन तंत्रज्ञान असलेली उत्पादने लाँच करण्यासाठी पूर्णत: सज्ज झाली आहे. कंपनी एलईडी, वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटर सारख्या उत्पादनांच्या श्रेणीमध्ये २१ नवीन आणि अत्याधुनिक उत्पादने सादर करणार आहे. यातील काही उत्पादने उच्च तंत्रज्ञानाने युक्त आहेत. यामध्ये व्हिडिओकॉन ४के – एचडीआर (बॉर्डर नसलेला) टीव्ही तसेच आयकॉनिक इंजिन तंत्रज्ञान असलेलया नवीन एलईडी टीव्हीची श्रंखलाही समाविष्ट आहे.
व्हिडीओकॉनचे आयकॉनिक इंजिन तंत्रज्ञान असे १००%* नवीन रंग बनवू शकते जे आपल्या डोळ्यांना दिसू शकतील. तसेच व्हिडिओकॉन द्वारे फ्रॉस्ट फ्री सेगमेंटमध्ये इन्व्हर्टर कॉम्प्रेसर असलेले एनर्जी एफिशियंट रेफ्रिजरेटर सुद्धा लाँच केले जाणार आहेत. या उत्पादनांच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना या सणांच्या मोसमात एक नवीन अनुभव प्रदान करण्याचा व्हिडिओकॉनचा उद्देश आहे.