भारतीय बनावटीच्या पाणबुडीभेदी सुरुंग ‘वरुणास्त्रा’चा नौदलात समावेश करण्यात आल्यामुळे हे सुरुंग बनवणा-या आठ देशांच्या पंगतीत भारताचा समावेश झाला आहे.
नवी दिल्ली- भारतीय बनावटीच्या पाणबुडीभेदी सुरुंग ‘वरुणास्त्रा’चा नौदलात बुधवारी समावेश करण्यात आला. यामुळे हे सुरुंग बनवणा-या आठ देशांच्या पंगतीत भारताचा समावेश झाला आहे.
डीआरडीओच्या नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेने हा विद्युत सुरुंग बनवला आहे. हा सुरुंग संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते नौदलाकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी नौदलप्रमुख सुनील लांबा ही उपस्थित होते.
संरक्षण सूत्रांनी सांगितले की, वरुणास्त्राचे वजन १.२५ टन असून ते २५० किलो स्फोटके वाहून नेऊ शकते. या वरुणाचा वेग तासाला ४० सागरी मैल आहे. या सुरुंगातील ९५ टक्के सामुग्री भारतीय बनावटीची आहे. या एका सुरुंगाची किंमत १० ते १२ कोटी रुपये आहे. हे सुरुंग सहजपणे स्टेल्थ पाणबुडीचाही भेद करू शकते. विशेष म्हणजे अत्यंत खोल व उथळ पाण्यात हे सुरुंग प्रभावी ठरू शकते.