बंदुकीचा धाकाने पाकिस्तानी नागरिकाशी बळजबरीने लग्न झालेली भारतीय महिला उज्मा गुरुवारी मायदेशी परतली.
नवी दिल्ली- बंदुकीचा धाकाने पाकिस्तानी नागरिकाशी बळजबरीने लग्न झालेली भारतीय महिला उज्मा गुरुवारी मायदेशी परतली. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी उज्माचे स्वागत केले असून आतापर्यंत ज्या त्रासाला सामोरे जाव लागले त्यासाठी माफीही मागितली आहे.
पाकिस्तानात बंदुकीचा धाक दाखवून पाकिस्तानी नागरिक ताहिर अलीने बळजबरीने उज्माशी लग्न केले होते. तसेच तिला मायदेशी परतू दिले जात नसल्यामुळे उज्माने भारतीय उच्चायुक्तालयात आश्रय घेत १२ मे रोजी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
बुधवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने उज्माला मायदेशी परतण्याची परवानगी दिली होती, तसेच पोलिसांना तिला वाघा सीमेपर्यंत सोडण्याचे आदेशही दिले होते.
माझी पहिल्या विवाहापासून झालेली मुलगी भारतात थॅलीसीमियाने आजारी असल्यामुळे मला मायदेशी जाण्याची मुभा द्यावी, अशी विनंती तिने याचिकेत केली होती. अलीनेही याचिका करून मला माझ्या पत्नीची भेट घेऊ द्यावी, अशी विनंती केली होती.
न्यायमूर्ती मोहसीन अख्तर कयानी यांनी बुधवारी दोन्ही याचिकांवर सुनावणी केली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्तींनी उज्माला मायदेशी परतण्याची मुभा दिली. न्यायालयाने उज्माची व्हिसा कागदपत्रे तिला परत केली. ही कागदपत्रे अलीने घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर त्याने ती न्यायालयाच्या स्वाधीन केली.
उज्मा आणि अली यांची मलेशियात भेट झाली होती. दोघांचे एकमेकांवर प्रेम जडल्यानंतर ती वाघा बॉर्डरमार्गे एक मे रोजी पाकिस्तानात आली होती. खैबर पख्तुनख्वातील बुनेर भागात जाऊन तिने तीन मे रोजी अलीशी विवाह केला.
नंतर व्हिसाच्या निमित्ताने इस्लामाबादेत येऊन तिने भारतीय उच्चायुक्तालयात आश्रय घेतला. अलीने बंदुकीचा धाक दाखवून बळजबरीने विवाह केला, असा आरोप करून जोपर्यंत भारतात परतण्याची मुभा मिळत नाही तोपर्यंत आपण येथून हलणार नाही, अशी खंबीर भूमिका घेत उज्माने लढा दिला.
EAM Sushma Swaraj to address a joint press conference with Uzma, who returned from Pakistan today after permission by Islamabad High Court pic.twitter.com/qtOKgFKJbx
— ANI (@ANI_news) May 25, 2017
Indian woman Uzma returned to India via Attari-Wagah border after Islamabad HC's permission, had alleged she was forced to marry a Pakistani pic.twitter.com/fzqNs4Xrpg
— ANI (@ANI_news) May 25, 2017