इतर शासकीय दाखले बनवणा-या अथर्व झेरॉक्स सेंटरचे मालक हेमंत पराडकर यांना व त्यांच्या दोन साथीदारांना बनावट सरकारी कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
उरण- उरण तहसील कार्यालयाजवळ असलेल्या ‘अथर्व झेरॉक्स सेंटर’ या दुकानातून रेशनकार्ड बनविण्यासाठी लागणारी कागदपत्रे तसेच इतर शासकीय दाखले बनवणा-या अथर्व झेरॉक्स सेंटरचे मालक हेमंत पराडकर यांना व त्यांच्या दोन साथीदारांना बनावट सरकारी कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
त्यांना न्यायालयाने १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे झेरॉक्स सेंटर चालवणा-या हेमंत पराडकर यांच्या दुकानात प्रतीकला मंगळवेढा तसेच सोलापूर येथील पुरवठा अधिकारी व तहसीलदार या नावाचे शिक्के आढळले.
तसेच सोलापूर येथील पुरवठा अधिकारी यांच्या नावाने शिक्के तसेच दोन रेशनकार्डे आढळली. त्यातील गणपत चौधरी अशा नावाचा उल्लेख आढळला. तहसीलदार मंगळवेढा येथील दाखलाही आढळला.
प्रतिक घरत यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी पुरवठा विभागाकडू माहिती मिळवली त्यावेळी गणपत चौधरी यांनी रेशनकार्ड मिळवण्यासाठी भाडेकरार मंगळवेढा तहसीलदार यांच्या कार्यालयातून रेशनकार्डावरील नाव कमी केलेला दाखला व इतर बनावट कागदपत्रे सादर केल्याचे आढळले.
मंगळवेढा कार्यालयातून असा कुठलाही दाखला मिळाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर गणपत चौधरी यांनी उरण येथील तहसील कार्यालयाला पुरवठा विभागातील खोटी कागदपत्रे सादर करून रेशनकार्डे मिळवल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हेमंत पराडकर (४२ रा. उरण), मनोज बडदे (३०), गणपत चौधरी (३२) यांना अटक झाली.