उत्तर प्रदेशच्या मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय ध्वज फडकावून राष्ट्रगीत गाण्याचे निर्देश मदरसा शिक्षण परिषदेने दिले आहेत.
लखनऊ- उत्तर प्रदेशच्या मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय ध्वज फडकावून राष्ट्रगीत गाण्याचे निर्देश मदरसा शिक्षण परिषदेने दिले आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त अशा प्रकारचे निर्देश पहिल्यांदाच दिले गेले आहेत.
१५ ऑगस्टला भारत ७० वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. मदरशा शिक्षा परिषदेने तसे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकामध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमाची रुपरेषा नमुद करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाची व्हिडिओ चित्रिकरण करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायन सकाळी आठ वाजता घेण्यास सांगितले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मिठाई देण्यात येईल. परिषदेने राष्ट्रगीत हिंदू आणि ऊर्दू दोन्ही भाषांमध्ये पाठवले आहे. योगी आदित्यनाथ सरकारच्या या निर्णयावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.