अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका ११ वर्षाच्या मुलाची इच्छा पूर्ण केली आहे. ट्विटरवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यानी ही माहिती दिली.
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका ११ वर्षाच्या मुलाची इच्छा पूर्ण केली आहे. ट्विटरवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यानी ही माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये ११ वर्षे वयाच्या व्हर्जिनियाच्या फ्रँक नावाच्या मुलाची इच्छा पूर्ण केली. त्याने व्हाईट हाऊसच्या गार्डनमधील लॉन कापण्यात मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांची व्यावसायिक पार्श्वभूमी पाहून फँ्रक अगदी भारावून गेला होता. ट्रम्प यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्याने स्वत:चा व्यवसायच सुरू केला. व्हाईट हाऊसमध्ये मला संधी मिळाल्यास मी स्वत: ला भाग्यवान समजेन, असे पत्रच फँ्रकने डोनाल्ड ट्रम्प यांना लिहिले होते. फ्रँक हा व्हाईट हाऊस जवळच्या फॉल्स चर्च परिसरातला रहिवासी आहे. याबाबत व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, फ्रँकने ट्रम्प यांचा व्यवसाय शिकण्याची इच्छा पत्रातून केली होती म्हणून त्याला आमंत्रित करण्यात आले होते. त्याने स्वत: लॉन-केअर चालविला.
गार्डनमध्ये लॉन मॉवर चालवण्यात फ्रँक दंग होता, तो कामात इतका रमला होता की रोझ गार्डनमध्ये खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तिथे आल्यावरदेखील त्याचे लक्ष कामावर होते. फ्रँकचे काम पाहून ट्रम्प म्हणाले की, हे राष्ट्राचे भविष्य आहे. आणि लवकरच हा प्रसिद्ध होईल. फ्रँकला नेव्हीमध्ये काम करायचे आहे आणि तेही तो नक्की करेल. त्यानंतर त्यांनी ट्विटर वरून फ्रँकचे आभारही मानले आणि त्याचे काम ए प्लस झाल्याचेही ट्विटरवर म्हटले. फँ्रक काम करताना ट्रम्प त्याचे काम पाहत असतानाचा व्हीडिओ डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.
[EPSB]
बेकायदा वास्तव्यास असलेल्या रोहिंग्या मुसलमान हे भारतासाठी धोकादायक आहेत त्यांना भारतात राहण्याची परवानगी देऊ नये, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.
[/EPSB]