काश्मीरमधील पुलवामा येथे पोलीस वसाहतीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहिद झाले आहे तर एका दहशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आले आहे.
पुलवामा- काश्मीरमधील पुलवामा येथे पोलीस वसाहतीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहिद झाले आहे तर एका दहशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी पुलवामा येथील पोलीस तळावर हा हल्ला केला.
पुलवामाच्या या तळावर सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस मोठया संख्येने आहेत. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास दहशतवाद्यांनी अचानक पोलीस दलाच्या तळावर बेछूट गोळीबार करण्यास सुरूवात केली आणि ग्रेनेटही फेकले. यामध्ये पाच जवान शहिद झाले असून राज्य पोलीस दलातील तीन पोलिसांचा तर सीआरपीएफच्या दोन जवानांचा समावेश आहे.
एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय दलाच्या जवानांना यश आले आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले असून ही चकमक अद्यापही सुरू असल्याचे समजते.
किमान दोन ते तीन दहशतवादी इमारतीत लपल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार गोळीबार सुरू आहे. दहशतवादी घुसलेले इमारत रिकामी करण्यात आली असून आसपासच्या इमारतीही रिकाम्या करण्यात आल्या आहेत.
#Update DPL Pulwama Encounter: CRPF jawan succumbs to injuries, taking death toll of security personnel to two.
— ANI (@ANI)
#Visuals DPL Pulwama Encounter: A CRPF Jawan & Policeman have lost their lives; encounter underway (visuals deferred) pic.twitter.com/ighywREoUn
— ANI (@ANI)