गुरगावमधील रायन इंटरनॅशनल शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये शुक्रवारी दुसरीत शिकणाऱ्या प्रद्मुम्न ठाकूर या विद्यार्थ्यांचा खून झाल्यानंतर नालासोपारा पश्चिमेकडील रायन इंटरनॅशनल शाळेच्या पालकांनी शाळेत धाव घेऊन शाळा प्रशासनाला शनिवारी जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
नालासोपारा- गुरगावमधील रायन इंटरनॅशनल शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये शुक्रवारी दुसरीत शिकणाऱ्या प्रद्मुम्न ठाकूर या विद्यार्थ्यांचा खून झाल्यानंतर नालासोपारा पश्चिमेकडील रायन इंटरनॅशनल शाळेच्या पालकांनी शाळेत धाव घेऊन शाळा प्रशासनाला शनिवारी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शाळा प्रशासनाने पालकांना उडवाउडवीची उत्तरे दिली व नालासोपारा पोलिसांना बोलावून पालकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्रकारांनाही आत जाण्यास मज्जाव केला.
गुरगावमधील रायन इंटरनॅशनल शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी दुसरीत शिकणाऱ्या प्रद्मुम्न ठाकूर या विद्याथ्याचा मृत्यू झाल्यानंतर पालकात प्रचंड अस्वस्थता जाणवली. त्यांनी शाळा प्रशासनाला आमच्या मुलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना आहेत याचा जाब विचारण्यासाठी सर्व पालक एकत्र झाले होते. मात्र, त्यांना आम्ही प्रत्येक तुकडीची वेगवेगळी सभा बोलावणार असल्याचे सांगून बोळवण केली. यावेळी पालकांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.पालक श्रीधर बांगर यांनी सांगितले की, दोन वर्षापूर्वी शाळा नवीन होती. त्यावेळी ज्या समस्या होत्या त्या आतासुद्धा तशाच आहेत. काहीही सुधारणा केली नाही. मुलांना मैदान नाही खेळायला. खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी पूर्ण वेळ शिक्षक नाही. शिक्षक कमी असल्याने मुलांवर पूर्ण वेळ लक्ष देऊ शकत नाही.
दिल्लीला जे दुसरीत शिकणाऱ्या मुलासोबत झाले ती रायन इंटरनॅशनल मेनेजमेंटची जबाबदारी होती. मेनेजमेंटच्या एका शाळेत असा प्रकार झाला ती जुनी शाळा होती. तसा प्रकार या शाळेत घडणार नाही याची काय गॅरंटी? ही शाळा गॅरंटी देत नाही. शाळेने इनडिव्हिजन बैठक घेणार असल्याचे पालकांना सांगितले. तसेच आद्याच्या वडिलांनी सांगितले की, मी खूप वेळा प्रोब्लेम हायलाईट केले असून या ठिकाणी ब्लेम गेम होत आहेत. कोणीही ऐकायच्या तयारीत नसतात. आजपर्यंत या शाळेत काही घडलं नाही. पण आम्ही वाट पहायची का, तसं काही घडायची. मुलांचे बाथरूम घाण असतात ते साफ केले जात नाही. मॅनेजमेंटचा, मुख्याध्यापकांचा वाढदिवस असला की मुलांकडून फुले मागवली जातात. लाईट गेली की पंखे बंद होतात. एवढी फी भरूनही इन्व्हर्टर सुद्धा शाळेत नाही. मुलांना गरमीत बसावे लागत आहे. दरम्यान, शाळा प्रशासनाला आपली बाजू विचारली असता त्यांनी आम्हाला काही बोलायचे नसल्याचे सांगितले.
[EPSB]
देशातील आणि जगातील अग्रगण्य युनिव्हर्सिटी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीत युनायटेड लेफ्टने चारही जागा जिंकल्या आहेत.
[/EPSB]