रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.
पुणे- रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास कोंढवे येथे तिने आत्महत्या केली.
डॉ. इंदू शाम डोंगरे असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. आजारपणाला कंटाळल्याने तिने आत्महत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.
डॉ. इंदू डोंगरे आणि त्यांचे पती डॉ. शाम डोंगरे यांचे पुण्यातील सुखसागरनगर येथे स्वत:चे गजानन रुग्णालय आहे. मागील काही दिवसांपासून इंदू मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार घेत होत्या.
या उपचारांना कंटाळूनच त्यांनी स्वतःच्या रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर उडी मारली. त्यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.