टी-२० मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. नियोजित कर्णधार स्टीव्हन स्मिथ खांद्याच्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेला मुकला आहे.
रांची- टी-२० मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. नियोजित कर्णधार स्टीव्हन स्मिथ खांद्याच्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेला मुकला आहे. दुखापत गंभीर असल्याने तो मायदेशी रवाना होणार आहे. आत्मविश्वास ढासळलेल्या ऑस्ट्रेलिया संघासाठी हा मोठा धक्का आहे.
पहिल्या टी-२० लढतीच्या सरावादरम्यान स्मिथ जखमी झाला. गंभीर दुखापत असल्याने त्याला मालिकेत खेळता येणार नाही. त्याला पुढील उपचारासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येणार आहे. शनिवारी ऑस्ट्रेलिया क्रिकेट काऊंन्सिलने हा निर्णय घेतला. स्टीव्ह स्मिथच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने टी-२० मालिकेत नेतृत्वाची धुरा सांभाळल्ी आहे. स्मिथच्या जागी ऑस्ट्रेलिया संघात अष्टपैलू मार्क स्टॉईनिसला स्थान देण्यात आले.
वनडे मालिकेतील दारूण पराभवानंतर (४-१) ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा पणाला लागली. टी-२० मालिकेत त्यांच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती. स्मिथवर पाहुण्यांची फलंदाजीची भिस्त आहे. त्यामुळे त्याच्या दुखापतीने संघ अधिक अडचणीत आला आहे.
[EPSB]
[/EPSB]